वृत्तसंस्था
बीजिंग : अर्थव्यवस्थेची घसरगुंडी, जागतिक व्यापाराचा खालावलेला आलेख यामुळे चीन संकटात सापडला आहे. त्यातच चीनच्या जनतेला विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. केवळ घरेच नाही तर कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी हाहाकार उडाला आहे. एकूणच दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा तयार केलेला भस्मासूर चीनवरच उलटल्याचे स्पष्ट होत आहे.Power crisis big in China; Not only at home but also in companies due to power outages
चीनच्या उत्तर प्रांतातील अनेक ठिकाणी वीज
पूरवठ्याची समस्या उभी राहिली आहे. अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असून रस्त्यावरचे सिग्नल बंद आहेत. एवढी भयानक परिस्थिती आहे. ऑस्ट्रेलियएवढी अर्थव्यवस्था असलेल्या गुंगडोंग औद्योगिक वसाहतीत वीज गायब आहे.
वसातीत राहणाऱ्या लोकांना नैसर्गिक अर्थात सूर्यप्रकाशावर चालणाऱ्या उत्पादनाचा वापर करून घरातील दिवे पेटवा असे सांगितले जात आहे. एअर कंडिशन कमी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. जेथे नागरिकांना वीज मिळत नाही तेथे मोठ्या कंपन्यांची वाट लागली आहे. विजेचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
उद्योगधंद्यांचं वीजपुरवठा कमी झाल्याने उत्पादन निर्मितीला खीळ बसणार आहे.त्याचा थेट परिणाम हा जागतिक निर्यात साखळीवर होणार आहे, असा इशारा नमुरा होल्डिंग लिमिटेड आणि चायना कॅपिटल कॉर्पोरेशनच्या अर्थ तज्ञानी दिला आहे.
चीनचा वीजपुरवठा कमी होण्याची दोन करणे
चीनचा वीजपुरवठा कमी होण्याची दोन करणे आहेत. अनेक कंपन्याना वीज कमी वापरण्याचे आदेश हे ऊर्जा कपात करण्याचे धोरण आणि कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्देशाने दिले आहेत. दुसरे कारण म्हणजे कोळसा आणि गॅसचे आभाळाला पोचलेल्या किमतीमुळे वीजनिर्मिती अडथळे येत आहेत.
वीज टंचाई पाठोपाठ महागाई वाढली
एका विजेच्या संकटामुळे उद्योगधंद्याची वाट लागली आहे. उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढली आणि तिचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे किमती वाढल्या. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेलीने त्यांच्या संपादकीय मध्ये वीज संकटाची कबुली दिली असून या संकटामुळे समाज जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली आहे.
Power crisis big in China; Not only at home but also in companies due to power outages
महत्त्वाच्या बातम्या
- Bhawanipur By-polls : बंगालमध्ये तृणमूलचा पुन्हा हिंसाचार, भवानीपूरमध्ये भाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या गुंडांचा हल्ला
- राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड
- Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली