वृत्तसंस्था
लंडन : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी स्वीकारेल, पण एकही मुस्लीम बेकायदेशीर घुसखोर स्वीकारणार नाही, अशी स्पष्टोक्ती पोलंडमधील खासदार डोमिनिक ट्रॅकझॅस्की यांनी केली आहे. एका इंग्लिश खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पोलंडची भूमिका स्पष्ट केली.Poland will accept 2 million Ukrainian refugees
रशिया युक्रेन युद्धामध्ये जे शरणार्थी असतील त्यांना पोलंड जरूर स्वीकारेल, पण एकही मुस्लिम बेकायदेशीर घुसखोर स्वीकारणार नाही. कारण आम्हाला पोलंडमधील सामाजिक शांतता जास्त महत्त्वाची आहे. मग आम्हाला कोणीही वंशवादी – रेसिस्टर, राष्ट्रवादी – नॅशनलिस्ट असे म्हटले तरी चालेल. आम्हाला त्याची पर्वा नाही, असे डॉमिनिक यांनी ठणकावून सांगितले.
युरोपीय समुदायाचा अध्यक्षांनी पोलंडच्या या भूमिकेवर आक्षेप नोंदवत पोलंडमधील सरकार रेसिस्ट आणि नॅशनलिस्ट आहे, अशी टीका केली होती. परंतु पोलंडमधील सत्ताधारी पक्षाच्या या खासदारांनी ही टीका पूर्णपणे फेटाळून लावली. उलट पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी यांना स्वीकारायला तयार आहे, असे स्पष्ट केले. पण त्याच वेळी मुस्लिम बेकायदा घुसखोरांना स्वीकारणार नाही. पोलंडमध्ये सामाजिक वातावरण सुरक्षित आहे. येथे एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, अशा शब्दांमध्ये युरोपीय समुदायाचा अध्यक्षांना आणि संबंधित प्रश्न विचारणार्या न्यूज अँकरला ठणकावले.
Poland will accept 2 million Ukrainian refugees
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू : छत्रपती संभाजी राजे
- उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिव ज्योति अर्पणम महोत्सव; क्षिप्रा नदीचा किनारा २१ लाख दिव्यांनी उजळणार
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट