• Download App
    अमेरिकेत फायझरच्या बूस्टर डोसला मनाई, बायडेन प्रशासनाला मोठा धक्का |Phyzer booster dose baned in USA

    अमेरिकेत फायझरच्या बूस्टर डोसला मनाई, बायडेन प्रशासनाला मोठा धक्का

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – फायझर लशीचा बूस्टर डोस १६ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्याविरोधात अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मतदान केले आहे. ‘एफडीए’च्या सल्लागारांच्या समितीने व्यापक स्वरूपात फायझरचा बूस्टरचा डोस देण्यास परवानगी नाकारली आहे. पण ६५ पेक्षा अधिक किंवा अति जोखीम वर्गातील व्यक्तींना बूस्टर डोस देण्यास मंजुरी दिली आहे.Phyzer booster dose baned in USA

    या प्रस्तावावर १६ विरुद्ध दोन असे मतदान झाले. अमेरिकी नागरिकांना डेल्टा विषाणूच्या घातक संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी फायझरचा बूस्टर डोस देण्याच्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रयत्नांना यामुळे खिळ बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



    दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेची ७६ वी परिषद पुढील आठवड्यात होणार असून त्यात अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भाषणात कोरोनाच्या जागतिक साथीचा शेवट, तापमानवाढीच्या समस्येविरोधात लढा, मानवी हक्क, लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसारचे दिशानिर्देशक या विषयावर भर दिला जाणार आहे, असे ‘यूएन’मधील अमेरिकेच्या प्रतिनिधीने सांगितले.

    Phyzer booster dose baned in USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या