• Download App
    पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली 13 ऑगस्टला विसर्जित होणार; पुढील निवडणूक नवाझ शरीफ लढवण्याची शक्यता|Pakistan's National Assembly to be dissolved on August 13; Nawaz Sharif is likely to contest the next election

    पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली 13 ऑगस्टला विसर्जित होणार; पुढील निवडणूक नवाझ शरीफ लढवण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली 13 ऑगस्टला विसर्जित केली जाणार आहे. पाकिस्तानचे कायदा मंत्री आझम नजीर तरार यांनी ही माहिती दिली. यासोबतच त्यांनी सांगितले की, आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफदेखील निवडणूक लढवू शकणार आहेत. तरार म्हणाले की- नवीन निवडणूक कायद्यानंतर पीएमएल-एन सुप्रिमोवरील बंदी उठवण्यात आली आहे. आता ते आणि पाकिस्तान शुगर माफिया जहांगीर खान निवडणूक लढवण्यास पात्र आहेत.Pakistan’s National Assembly to be dissolved on August 13; Nawaz Sharif is likely to contest the next election



    पाकिस्तानच्या एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले – पाक संसदेचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. यानंतर काळजीवाहू सेटअप केला जाईल, जेणेकरून निवडणुका होईपर्यंत संसदेचे कामकाज चालू ठेवता येईल. मात्र, देशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच बरखास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    पाकिस्तानमध्ये कोणालाही आजीवन अपात्र ठरवले जाणार नाही

    ऐरी न्यूजनुसार, कायदा मंत्री म्हणाले – पाकिस्तानच्या नवीन कायद्यानुसार आता कोणालाही आजीवन अपात्र ठरविले जाणार नाही. आता त्याची कमाल कालावधी फक्त 5 वर्षे असेल. आता या बदलाचा फायदा कुणाला मिळत असेल तर उद्या दुसऱ्याला मिळेल.

    पाकिस्तानमध्ये संसदेशिवाय कोणीही कायदा बदलू शकत नाही. त्याचवेळी तरार म्हणाले की, पाकिस्तानमधील आघाडी सरकार आपल्या भागीदारांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही.

    Pakistan’s National Assembly to be dissolved on August 13; Nawaz Sharif is likely to contest the next election

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या