Basmati PGI TAG : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा वाद शांततेने सुटल्याचा दावा पाकिस्तानी वृत्तापत्राने केला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये जमीन आणि सागरी वाद सुरू असताना दोन्ही देशांमध्ये बासमती तांदळावर एकमत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द ट्रिब्यूनने असा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानने बासमती तांदळाच्या हक्काबाबत करार केला आहे. दोन्ही देशांनी चर्चेच्या आधारे हा मोठा वाद मिटविला आहे. Pakistani Media Claims India Pakistan agreement over Basmati PGI TAG Read Details
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा वाद शांततेने सुटल्याचा दावा पाकिस्तानी वृत्तापत्राने केला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये जमीन आणि सागरी वाद सुरू असताना दोन्ही देशांमध्ये बासमती तांदळावर एकमत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द ट्रिब्यूनने असा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानने बासमती तांदळाच्या हक्काबाबत करार केला आहे. दोन्ही देशांनी चर्चेच्या आधारे हा मोठा वाद मिटविला आहे.
काय होता बासमती तांदळाचा वाद?
भारत-पाकिस्तानमध्ये बासमती तांदळावर जीआय टॅग लावण्यासाठी वाद झाला. वस्तुतः भारताने बासमती तांदळाच्या खास ट्रेडमार्कसाठी युरोपीयन संघाकडे अर्ज केला होता, जेणेकरून भारताला बासमती तांदळाच्या टायटलचा हक्क मिळू शकेल. पण मालकी हक्कासाठी भारत युरोपियन युनियनमध्ये पोहोचताच, पाकिस्ताननेही भारताच्या दाव्याला विरोध करण्यासाठी पाठपुरावा केला. पाकिस्तानने म्हटले की, बासमती तांदळाच्या मालकीचा हक्क भारताला मिळाला तर त्यामुळे पाकिस्तानचे बरेच नुकसान होईल. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये अल-बरकत राईस मिल चालवणाऱ्या गुलाम मुर्तजा यांनी “हे आमच्यावर अणुबॉम्ब टाकण्यासारखे आहे” असेही म्हटले होते. युरोपियन युनियनमध्ये, प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन (पीजीई) घेण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानने विरोध दर्शविला होता.
भारत-पाकिस्तान करार?
हा वाद बासमती तांदळासंदर्भात युरोपियन संघात पोहोचला होता आणि युरोपियन युनियनने असे म्हटले होते की, परस्पर चर्चेतून दोन्ही देश या समस्येवर तोडगा काढतील. पाकिस्तानी वृत्तपत्र द ट्रिब्यूनने दावा केला आहे की, ‘भारतीय आणि पाकिस्तानी तांदूळ निर्यातदारांनी एकत्रितपणे बासमती तांदळाच्या मालकीची तयारी दर्शविली आहे.’ कराची भात उत्पादक फैजान अली म्हणाले की, ‘बासमती तांदळावर दोन्ही देशांची मालकी हवी होती आणि हाच या वादावर तोडगा होता’. नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांनी फार पूर्वीपासून दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार्या बासमती तांदळाच्या मालकीचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फैझान अली म्हणाले की, बासमती तांदळाच्या मालकीसाठी दोन्ही देशांनी अर्ज केला होता, हे चुकीचे आहे. बासमती तांदळाचे मूळ पंजाब आहे आणि ते दोन्ही देशांमध्ये पिकविले जाते. तर दोन्ही देशांना बासमती तांदळाची मालकी मिळाली पाहिजे.
पीजीआय म्हणजे काय?
पीजीई (संरक्षित भौगोलिक संकेत) स्थिती भौगोलिक उत्पादनांवर बौद्धिक संपत्ती अधिकार प्रदान करते. भारताचा दार्जिलिंग चहा, कोलंबियाची कॉफी आणि बर्याच फ्रेंच उत्पादनांना पीजीआय टॅग मिळाला आणि बासमती तांदळासाठीही पीजीआय टॅग मिळावा अशी भारताची इच्छा होती. यासाठी युरोपियन युनियनकडे भारताने अर्ज केला होता. ज्या उत्पादनांना पीजीआय टॅग मिळतो, त्यांची नकलीवरून सुरक्षा मिळते, म्हणजे ते उत्पादन इतर कोणत्याही देशाद्वारे कॉपी केली जाऊ शकत नाही आणि पीजीआय टॅग मिळाल्यानंतर बाजारात त्या उत्पादनाची किंमत आणखी वाढते. जर भारताला पीजीआयचा टॅग मिळाला तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. तथापि, आता पाकिस्तानकडून असा दावा केला गेला आहे की, दोन्ही देशांना त्याची मालकी मिळेल आणि दोन्ही देशांनी त्यास सहमती दर्शविली आहे.
Pakistani Media Claims India Pakistan agreement over Basmati PGI TAG Read Details
महत्त्वाच्या बातम्या
- Ram Mandir Land Deal : रजिस्ट्रीचे साक्षीदार अयोध्येचे महापौर म्हणाले- परस्पर सहमतीने झाली खरेदी, कोणताही घोटाळा नाही!
- कोल्हापुरात पोलीस आणि मराठा आंदोलकांत झटापट, अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं
- अदानी ग्रुपमध्ये 43,500 कोटींची गुंतवणूक करणाऱ्या 3 परदेशी फंडांची खाती गोठवली, कंपनीचे शेअर कोसळले
- ओडिशात चक्रीवादळाच्या विध्वंसादरम्यान 300 बालकांचा जन्म, अनेक कुटुंबीयांनी नाव ठेवले ‘यास’
- लोजपात बंडाळी : LJP अध्यक्ष चिराग पासवान यांच्या पक्षाला खिंडार, पक्षाच्या 5 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र