• Download App
    कंगाल पाकिस्तान : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकने पंतप्रधानांचे निवासस्थान काढले भाड्याने, गेस्ट हाऊसपासून लॉनपर्यंत रेंटने मिळणार । Pakistan Prime Minister Imran Khan Islamabad House On Rent

    कंगाल पाकिस्तान : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकने पंतप्रधानांचे निवासस्थान काढले भाड्याने, गेस्ट हाऊसपासून लॉनपर्यंत रेंटने मिळणार

    Pakistan Prime Minister Imran Khan : पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान भाड्याने उपलब्ध आहे. होय, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने इस्लामाबादमधील पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान सर्वसामान्यांना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणीही सांस्कृतिक, फॅशन आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांसाठी हे भाड्याने घेऊ शकतील. Pakistan Prime Minister Imran Khan Islamabad House On Rent


    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान भाड्याने उपलब्ध आहे. होय, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने इस्लामाबादमधील पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान सर्वसामान्यांना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणीही सांस्कृतिक, फॅशन आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांसाठी हे भाड्याने घेऊ शकतील.

    यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये जेव्हा सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार स्थापन झाले, तेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी निवासस्थानाला विद्यापीठात बदलण्याची घोषणा केली होती. यानंतर इम्रान खान यांनी ते रिकामे केले. स्थानिक ‘समा टीव्ही’ने वृत्त दिले की, सरकारने आता विद्यापीठाच्या त्या प्रकल्पाकडे पाठ फिरवली आहे आणि पंतप्रधानांचे निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

    डिप्लोमॅटिक फंक्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रेदेखील होणार

    स्थानिक माध्यमांनुसार, याप्रकरणी लवकरच इम्रान मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानातून महसूल मिळवण्याच्या मुद्यावर चर्चा केली जाईल. पंतप्रधान निवासस्थानाचे सभागृह, दोन अतिथी विंग आणि लॉन भाड्याने देऊन महसूल गोळा केला जाईल असे सांगितले जात आहे. या कॅम्पसमध्ये डिप्लोमॅटिक फंक्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रेदेखील आयोजित केली जातील. सरकार अशा कार्यक्रमांमधून भाडे गोळा करून कमाई करणार आहे.

    इम्रान म्हणाले होते, आमच्याकडे जनतेसाठी पैसा नाही

    जेव्हा इम्रान खान यांनी 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितले होते की, पाकिस्तान सरकारकडे लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसा नाही, तर देशातील काही लोक आमच्या वसाहतवादी स्वामींसारखे जगत आहेत. तेव्हापासून ते त्यांच्या बानी गाला निवासस्थानी राहत आहेत आणि फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करतात.

    इम्रान खान सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या 3 वर्षांत 19 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. जेव्हा इम्रान पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारी खर्चात कपात करण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली.

    याआधी माजी अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याची टिप्पणी केली होती. इम्रान सरकार आल्यानंतर देशावरचे कर्ज 45 हजार अब्ज रुपयांनी वाढले आहे.

    Pakistan Prime Minister Imran Khan Islamabad House On Rent

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!