विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान : शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपल्या भाषणादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अफगान मुजाहिद्दीनची तुलना अमेरिकेच्या संस्थापकांशी केली होती.
Pakistan PM Imran Khan wrongly claims ex US president Ronald Reagan compared Mujahideens to America’s founding fathers
आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनावधानाने हे देखील सांगितले होते की, पाकिस्तान आणि अमेरिकेनेच अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन गटांना लष्करी प्रशिक्षण दिले होते. अफगाणिस्तान मधील मुजाहिद्दीन गटांमध्ये अलकायदा, मुजाहिद्दीन अफगाण, मुजाहिद्दीन असे जगातील विविध गट होते. अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अफगाण मुजाहिद्दीना १९८३ मध्ये व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.
तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला
पाकिस्तानी पंतप्रधान एका आंतरराष्ट्रीय मंचावर असे खोटे आणि अपमानजनक दावे कसे करू शकतात? असा प्रश्न पाकिस्तानी पत्रकार घरीद फारुकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकार कार्यकर्ते सलीम जावेद यांनी २ मार्च १९८५ साली रेकॉर्ड केलेली मूळ व्हिडिओ क्लीप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
यामध्ये रोनाल्ड रेगन यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अक्शन कॉन्फरन्सच्या वार्षिक परिषदेदरम्यान एक वक्तव्य केलेले दिसून येते. पण हे वक्तव्य त्यांनी अफगाण मुजाहिद्दीन बद्दल केले नसून, या व्हिडिओ क्लिपमधून हे साफ स्पष्ट होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी निकारायुगा सरकार उलथवून टाकण्याचे हे विधान केले होते. निकारागुआ सरकार पाडण्यासाठी त्यांनी बंडखोरांना 14 दशलक्ष डॉलर्स इतकी मदत जाहीर केली होती आणि त्यांना अमेरिकेच्या संस्थापकांशी कम्पेअर केले होते. अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन गटांसोबत तुलना करणे शक्य नाही, असे मानवाधिकार कार्यकर्ते सलीम जावेद यांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींवर मीडियामध्ये बरीच मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Pakistan PM Imran Khan wrongly claims ex US president Ronald Reagan compared Mujahideens to America’s founding fathers
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या 3 बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई : अनिल परब चौकशीसाठी पोहोचले, भावना गवळींच्या निकटवर्तीयाला अटक, आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल
- मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या जवळच्या सहकारी सईद खानला अटक
- उरीमध्ये दहशतवादावर प्रहार, भारताच्या लष्कराने पाक घुसखोराला पकडले, 5 दिवसांत 4 दहशतवादी यमसदनी
- ‘पांचजन्य’ने अमेझॉनला केले लक्ष्य, ईस्ट इंडिया कंपनी 2.0 म्हणून उल्लेख, लघु उद्योगांवरील परिणाम केले उघड