Pakistan import cotton from India : बुधवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताबरोबर व्यापार सुरू करण्याची घोषणा केली. 19 महिन्यांपासून बंद असलेला दोन्ही देशांमधील व्यापार आता पुन्हा सुरू होणार आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने (ईसीसी) खासगी क्षेत्राला 500 लाख टन टन साखर आणि कापूस आयात करण्यास बुधवारी मान्यता दिली. पाकिस्तानचे अर्थमंत्री हम्मद अझर यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. Pakistan import cotton from India, Pakistan FM announced
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बुधवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताबरोबर व्यापार सुरू करण्याची घोषणा केली. 19 महिन्यांपासून बंद असलेला दोन्ही देशांमधील व्यापार आता पुन्हा सुरू होणार आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने (ईसीसी) खासगी क्षेत्राला 500 लाख टन टन साखर आणि कापूस आयात करण्यास बुधवारी मान्यता दिली. पाकिस्तानचे अर्थमंत्री हम्मद अझर यांनी स्वत: याबाबत माहिती दिली.
पाक अर्थमंत्री म्हणाले की, जूनपासून पाकिस्तानकडूनही कापूस आयात सुरू होईल. नव्या अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ईसीसी बैठकीत 21 मुद्द्यांवर चर्चा झाली. यात वस्त्रोद्योग विभागाने ईसीसीकडून मूल्यवर्धित कापड क्षेत्रासाठी कच्च्या मालाची कमतरता दूर करण्यासाठी कापूस आणि सूती धाग्याच्या आयातीवरील बंदी हटविण्याची मागणी केली होती.
याव्यतिरिक्त वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तानच्या व्यापार महामंडळ आणि वाणिज्यिक आयातक यांच्यामार्फत भारताकडून साखरेच्या आयातीस मान्यता देण्याचे आवाहन केले होते.
पाकिस्तानने कापूस आणि साखर आयातीला परवानगी दिल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. ऑगस्ट 2019 मध्ये, जेव्हा जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला तेव्हा पाकिस्तानने भारताशी व्यापार बंद केला होता. दरम्यान, गतवर्षी पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला होता त्यावेळी पाकिस्ताननेही भारतातून औषधांची आयात सुरू केली होती.
आतापर्यंत पाकिस्तानने आपली गरज भागविण्यासाठी भारत वगळता जगातील इतर देशांकडून कापूस, धागा आणि साखर आयात करत होता, पण जगातील इतर देशांकडून आयात करणे पाकला खूप महागात पडत होते. पाकिस्तानमधील महागाईमुळे जनतेची कंबरडे मोडत आहे. सरकार महागाई कमी करण्यासाठी दबाव आणला जात आहे, पाकिस्तानी नागरिकांच्या दबावापुढे झुकत अखेर पाकिस्तानने भारताकडून साखर व कापसाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
In the end, it was up to Pakistan to import cotton and sugar from India, announced the Finance Minister of Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- पुन्हा एकदा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इंम्तियाज जलील ‘आमने-सामने’
- WB-Assam 2nd Phase Voting : बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 39 जागांवर मतदान सुरू, पीएम मोदींचे विक्रमी मतदानाचे आवाहन
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर भावुक झाले माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, म्हणाले माझे मन जिंकले आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय खाद्यपदार्थांचे ब्रॅँड, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील् योजनेस केंद्राची मान्यता
- आधार पॅनकार्डला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ