• Download App
    फक्त मुलांनीच शाळेत यावे, अफगणिस्तानात तालिबानी सरकारचा आता नवा फतवा|Only boys can go to school in Afghanistan

    फक्त मुलांनीच शाळेत यावे, अफगणिस्तानात तालिबानी सरकारचा आता नवा फतवा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाने सहावी ते बारावीच्या सर्व मुलग्यांनी उद्यापासून शाळेत हजर रहावे, असे आदेश दिले आहेत. सर्व पुरुष शिक्षकांनाही कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.Only boys can go to school in Afghanistan

    शिक्षण मंत्रालयाने फेसबुकवरून हा आदेश जारी केला आहे. आदेशात मुलींना आणि महिला शिक्षकांना शाळेत येण्याबाबत कोणतीही सूचना केलेली नाही. तालिबानने पहिली ते सहावीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना शाळेत येण्याची परवानगी दिली आहे.



    अफगाणिस्तानमध्ये अद्यापही काही प्रांतांमध्ये नोकरदार अथवा व्यावसायिक महिलांना कामावर जाण्यास मनाई आहे.अफगणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून रोज नवनवे फतवे काढले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांविरोधी फतव्यांचा जास्त समावेश आहे.

    गेल्या बारा वर्षात येथे मुलींच्या शिक्षणाची कवाडे खुली झाली होती. मात्र तालिबानचा मुलींच्या शिक्षणास कडवा विरोध आहे. मात्र जगभरातून हणारी टीकेची झोड थांबवण्यासाठी त्यांनी मुलींच्या शिक्षणाला परवानगी देण्याचे धोऱणे जाहीर केले होते.

    अर्थात आता त्यात तालिबान्यांनी पुन्हा वगळा खोडा घातला आहे. आता लहान मुलींच्या शिक्षणाला त्यांनी परवानगी दिली असून मोठ्या मुलींच्या शिक्षणाला मात्र विरोध केला आहे.

    Only boys can go to school in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार