वृत्तसंस्था
कराची – भारतासह संपूर्ण जगभरात सोमवारी जन्माष्टमी साजरी होत असताना पाकिस्तानात सिंध प्रांतातील संघार जिल्ह्यात खिर्पो भागात भगवान श्रीकृष्ण मंदिराची नासधूस करण्यात आली. मंदिरातील मूर्तीची हानी करण्यात आली असून तेथे हजर असलेल्या हिंदू नागरिकांना मारहाणही करण्यात आली. Once again attack on temple in Pakistan
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेथे परिस्थितीवर नियंत्रण असून मंदिरातील गर्दी हटवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पण याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमीनिमित्त नागरिक मोठ्या संख्येने जमलेले असताना समाजकंटकांनी हल्ला केला. या कार्यक्रमाची पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती. या महिन्याच्या प्रारंभीच पंजाब प्रांतात रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग भागात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता.
सिंध प्रांतात घडलेल्या या घटनेची माहिती पाकिस्तानातील मानवाधिकार हक्क कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी सोशल मीडियावर दिली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीची जय्यत तयारी होत असताना समाजकंटकांनी मंदिरावर हल्ला केल्याचे ऑस्टिन यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. सिंध प्रांतातील खिर्पो भागात झालेल्या हल्ल्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोचवले.
Once again attack on temple in Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यासमोरच मनसेने फोडली दहीहंडी; मुंबईत नियमभंग प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल
- काश्मीरमध्ये सैन्य दलाची नवे पाऊल; दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद; आपल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केले आवाहन