विशेष प्रतिनिधी
काठमांडू : नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आज तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडे आली. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विश्वास दर्शक ठराव गमावला होता. मात्र त्यानंतर विरोधकांना सत्ता स्थापण्यात अपय़श आले.OLi once again become PM of nepal
ओली यांना आता तीस दिवसांमध्ये विश्वाासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. हे करण्यात त्यांना अपयश आल्यास पुढील घटनात्मक प्रक्रिया केली जाणार आहे.
के. पी. शर्मा ओली हे नेपाळ काँग्रेस पक्षाचे (माओवादी-लेनिनवादी) अध्यक्ष आहेत. पुष्पकमल दहल यांनी पाठिंबा काढल्याने अडचणीत आलेल्या ओली यांनी १० मे रोजी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विश्वायसदर्शक ठराव मांडला होता.
पुरेशा पाठिंब्या अभावी त्यांचा पराभव झाल्यानंतर देशाच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी विरोधकांना सत्ता स्थापण्याची संधी देत तीन दिवसांचा कालावधी दिला होता.
मात्र, एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात विरोधकांना अपयश आले. त्यामुळे भंडारी यांनी ओली यांनाच पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर नियुक्त करत त्यांना शपथ दिली.