कोरोनानं जगभरात अनेकांचं मोठं नुकसान केलं आहे. अनेक कुटुंबातील सदस्य गेल्याने त्यांचं दुःख हे वर्णन करता येणार नाही असं आहे. पण कोरोनामुलं घडलेल्या सर्वात वाईट गोष्टींपैकी एक म्हणजे यामुळं माणसं दुरावली गेली. कोरोनामुळ लोकांच्या भेटीगाठी बंद झाल्या. एवढंच काय तर काही कारणांमुळं एकमेकांपासून लांब असलेल्या दाम्पत्यांमधला दुरावा या कोरोनानं जास्तच वाढवला. त्यामुळं आपल्या माणसाचा सहवासही लोकांना मिळेना झाला. त्यातही आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये जेव्हा आपला जोडीदार कायम सोबत राहावा असं वाटत असताना या काळातही अनेक वृद्धांना एकमेकांचा दुरावा सहन करावा लागला. अनेक ठिकाणी ज्येष्ठांना लागण होऊ नये म्हणून त्यांना वेगळं करण्यात आलं. पण शारीरिक व्याधी नको म्हणून त्यांना केवढा मानसिक त्रास सर्वांनी दिला, याची जाणीव करून देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. Older couple reunion after months in pandemic
हेही पाहा –