malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. मलाला म्हणाली की, महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल तिला खूप काळजी वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाची ही पहिली प्रतिक्रिया आहे. nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. मलाला म्हणाली की, महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल तिला खूप काळजी वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाची ही पहिली प्रतिक्रिया आहे.
मलालने ट्वीट केले की, “अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे, हे पाहून आम्हा सर्वांना खूप धक्का बसला आहे. मला तिथल्या महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची खूप चिंता आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धविरामाचे आवाहन करावे, त्वरित मानवतावादी मदत द्यावी आणि निर्वासित व नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे.”
मलाला युसूफझाई आधीपासूनच तालिबानच्या निशाण्यावर राहिलेली आहे. त्यामुळेच मलालाला पाकिस्तान सोडावे लागले. खरं तर केवळ मलालाच नाही, जगभरातील अनेक लोकांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानात भारतासह अनेक देशांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली होती, आता या त्यांचे भविष्य अंधारात लोटले आहे.
nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil
महत्त्वाच्या बातम्या
- Ali Ahmad Jalali Profile : कोण आहेत अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती जलाली; अमेरिकेत जन्म, अफगाणी सैन्यात कर्नलही होते !
- मेक इन इंडियाचे यश : जो देश फक्त आयातच करायचा, तोच आता 3 अब्ज डॉलर्सच्या मोबाइल फोनची निर्यात करतोय
- पेट्रोल अन् डिझेल विसरा : आता पाण्यावर धावणार तुमची कार, पीएम मोदींकडून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा
- अफगणिस्तानात आता तालिबानी राजवट, अमेरिकी दूतावासावर हेलिकॉप्टर उतरले, राजदूतांनी संवेदनशील कागदपत्रे जाळली
- WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, 28 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले