Nobel Prize 2021 : साहित्यातील 2021 चे नोबेल पारितोषिक टांझानियन कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अब्दुलरझाक यांना वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृती तसेच खंडांमधील निर्वासितांची स्थिती यांचे करुण चित्रण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. Nobel Prize 2021 In Literature Is Awarded To The Novelist Abdulrazak Gurnah
वृत्तसंस्था
स्टॉकहोम : 2021 चे साहित्यातील नोबेल पारितोषिक टांझानियन कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अब्दुलरझाक यांना वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृती तसेच खंडांमधील निर्वासितांची स्थिती यांचे करुण चित्रण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.
झंझीबार येथे जन्म
अब्दुलरझाक गुरनाह यांचा जन्म 1948 मध्ये झंझिबार, टांझानिया येथे झाला. पण ते शरणार्थी म्हणून 1960च्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये गेले. सेवानिवृत्तीपूर्वी ते केंट, कॅंटरबरी विद्यापीठात इंग्रजी आणि उत्तर -औपनिवेशिक साहित्याचे प्राध्यापक होते.
गुरनाह यांची चौथी कादंबरी ‘पॅराडाइज’ (1994) ने त्यांना लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. 1990च्या सुमारास त्यांनी पूर्व आफ्रिकेच्या संशोधन सहलीदरम्यान ती लिहिली आहे. ही एक दुःखद प्रेमकथा आहे ज्यात समाज आणि मान्यता एकमेकांशी भिडतात.
निर्वासितांचे मार्मिक वर्णन
अब्दुलरझाक ज्या प्रकारे निर्वासितांच्या अनुभवाचे वर्णन करतात ते दुर्मिळ आहे. ते ओळख आणि स्व-प्रतिमेवर लक्ष केंद्रित करतात. त्यांचे पात्र संस्कृती आणि खंडांमध्ये अशा जीवनात आढळतात जिथे निराकरण होऊ शकत नाही.
अब्दुलरझाक गुरनाह यांनी दहा कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा प्रकाशित केल्या आहेत. निर्वासितांच्या समस्यांचे वर्णन त्यांच्या लेखनात अधिक आहे. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. त्यांची लेखनाची भाषा सुरुवातीला स्वाहिली होती. पुढे त्यांनी त्यांच्या साहित्यिक लिखाणाचे माध्यम इंग्रजी केले.
Nobel Prize 2021 In Literature Is Awarded To The Novelist Abdulrazak Gurnah
महत्त्वाच्या बातम्या
- World Most Powerful Passport 2021 : जपान, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल, भारताचा यादीत ९० वा क्रमांक; पाकिस्तान, उत्तर कोरियाचा मात्र अतिशय कमकुवत
- जगाला मिळाली मलेरियाची लस : WHO कडून पहिल्या मलेरिया लसीला मंजुरी, गंभीर रुग्णांची जोखीम होणार कमी
- देशातील 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती तब्बल 58 लाख कोटींच्या पुढे, एका वर्षात अदानींची संपत्तीत तिप्पट वाढ
- मुंबईसह ठाणे-कल्याणमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार; राज्यात परतीच्या पावसाने घातला जोरदार धुमाकूळ
- लोकसभा पोटनिवडणूक; मंडीत टायगर हिलच्या विजयी वाघाचा सन्मान; मध्य प्रदेश, दादरा नगर हवेलीतून भाजपचे मराठी उमेदवार