वृत्तसंस्था
टोरोंटो – कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्यू यांच्या लिबरल पक्षाला संसदीय निवडणूकीत विजय मिळाला आहे. मात्र, ट्रुड्यू यांना हवे असलेले बहुमत मात्र त्यांच्या पक्षाला मिळाले नाही. बहुमतासाठी १७० जागांवर विजय आवश्यरक असताना लिबरल पक्षाला १५६ जागा मिळाल्या आहेत.No full majority to Justn Due in Canada
जस्टीन ट्रुड्यू हे अल्पमतातील सरकार चालवत आहेत. कोरोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या चांगल्या कामगिरीचा मोबदला म्हणून जनता आपल्या पक्षाच्या पदरात संपूर्ण बहुमत टाकेल असा अंदाज असल्याने त्यांनी, सरकार कोसळण्याची शक्यता नसतानाही निवडणूक जाहीर केली होती.
मात्र, जनतेने त्यांना पुन्हा अल्पमतातच ठेवले. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी पंतप्रधानांनी दोन वर्षे आधीच निवडणूक घेत जनतेचे आरोग्य धोक्यात टाकले आहे, अशी टीका त्यांचे विरोधक करत आहेत.
No full majority to Justn Due in Canada
महत्त्वाच्या बातम्या
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता