• Download App
    पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू धडकू नयेत यासाठी ‘नासा’ची महत्वाकांक्षी मोहीम सुरु |NASA's ambitious mission to prevent asteroids and comets from hitting the Earth begins

    पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू धडकू नयेत यासाठी ‘नासा’ची महत्वाकांक्षी मोहीम सुरु

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – पृथ्वीवर लघुग्रह अथवा धूमकेतू धडकू नयेत यासाठीची डबल ॲस्टेरॉईड रिडारेक्शन टेस्ट (डार्ट) मोहीम अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने सुरू केली. हा उपग्रह आता अवकाशात जाऊन लघुग्रहावर धडकणार आहे. अशा प्रकारे धडक घडवून आणून लघुग्रहाची किंवा धूमकेतूची दिशा बदलता येऊ शकते का याचा अभ्यास करण्यात येणार आहे. एखादा लघुग्रह किंवा मोठी उल्का पृथ्वीच्या कक्षेत येण्यापासून वाचविता येऊ शकेल का हे पाहण्याचाही हेतू या प्रयोगामागे आहे.NASA’s ambitious mission to prevent asteroids and comets from hitting the Earth begins



    डबल ॲस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट (डार्ट) असे या मोहिमेचे नाव आहे. अवकाशात सोडण्यात आलेले यान ‘डिडिमोस’ या लघुग्रहाला धडकविण्यात येणार आहे. या टकरीमुळे ‘डिडिमोस’च्या दिशेत किंवा मार्गात बदल होतो का याचे निरीक्षण करणार आहे. या मोहिमेसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

    डिडिमोस लघुग्रहाचा शोध १९९६ मध्ये लागला. डिडिमोसचा ७८० मीटर लांब आहे. ‘डिडिमोस’ भोवती एक लघुग्रह फिरतो, त्याचे ‘डिमोर्फस’ असे नाव आहे. त्याची लांबी १६० मीटर आहे. ‘डिडिमोस’ पृथ्वीला धडकण्याची शक्यता नाही, त्यामुळे प्रयोगासाठी या लघुग्रहाची निवड केली. यापूर्वी ‘डिडिमोस’ २००३मध्ये पृथ्वीच्या जवळून गेला होता. आता २०२२मध्ये तो पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाणार आहे.

    हा प्रयोग पुढीलप्रमाणे होणार आहे. अवकाशात सोडण्यात आलेल्या यानाचे दोन भाग आहेत. एक भाग (इम्पॅक्टर) लघुग्रहावर धडकेल, तर दुसरा भाग या घटनेची छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवेल. ‘इम्पॅक्टर’ साधारण २३७६० किलोमीटर प्रतितास या वेगाने ‘डिडिमोस’वर धडकेल. या धडकेमुळे लघुग्रहाचा वेग एक टक्क्यांनी कमी होण्याची आणि त्याचा परिभ्रमणाचा मार्ग बदलण्याची शक्यता आहे. ही सर्व घटना ‘लिसिया क्युब’ या यानाच्या छोट्या भागाद्वारे नोंदविली जाईल.

    हा भाग इटलीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. प्रत्यक्ष धडकेपूर्वी दोन दिवस हा भाग मुख्य यानापासून वेगळा होईल. आतापर्यंत १० लाखांहून अधिक उल्का वा लघुग्रहांचा शोध लागला आहे. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे जेवढे अंतर आहे, तेवढ्या अंतरावर साधारण २७ हजार लघुग्रह अथवा उल्का असल्याचा अंदाज. या लघुग्रहांचा आकार १४० मीटरहून अधिक आहे.

    NASA’s ambitious mission to prevent asteroids and comets from hitting the Earth begins

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही