वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ ने मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार केला. मंगळावरील कार्बन डायऑक्साइडमधून हा ऑक्सिजन तयार केला आहे.NASA produces oxygen on Mars
पेरसेवेरेसन्स रोव्हर 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरले होते. मंगळवरचे वातावरण पृथ्वीपेक्षाही वेगळे आहे. त्यामुळे तेथे ऑक्सिजन निर्मितीचे आव्हान होते. रोव्हरमधून नासाने ‘मॉक्सि’ (MOXIE) हे खास उपकरण मंगळावर पाठवले होते.
त्यातून ऑक्सिजन तयार केला जात आहे. हे उपकरण टोस्टरच्या आकाराचे असून 5 ग्रॅम ऑक्सिजन तयार होतो. हा 5 ग्रॅमचा ऑक्सिजन अंतराळवीर 10 मिनिटांसाठी श्वास घेण्यासाठी वापरू शकतात.
परग्रहावर ऑक्सिजन तयार करता येणे ही विशेष बातमी आहे. ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली तर मानवाला परग्रहावर वस्ती करणे सोपे जाणार आहे.