विशेष प्रतिनिधी
दिल्ली : नजला बौडेन रोमधेन यांची नुकतीच ट्युनिसिया या देशाच्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. या नियुक्ती नंतर इंटरनेटवर त्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.
63 वर्षीय नजला आहेत तरी कोण?
1958 साली त्यांचा जन्म कौरोआन येथे झाला. त्या व्यवसायाने इंजिनीअर आहेत. नॅशनल स्कूल ऑफ इंजिनिअर्स ट्युनिस येथे त्या जिओलॉजी या विषयाच्या प्रोफेसर म्हणून काम करतात. इकोल देस माईन्स दे पॅरिस येथून अर्थक्वेक इंजिनिअरिंग मधून पीएचडी ही पदवी संपादन केली आहे. जिओसायन्स हा त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय होता.
Najla Bouden Romdhane, First female prime minister from arab countries
29 सप्टेंबर 2021 रोजी ट्युनिसिया या देशाच्या त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्ती सोबत त्यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर लिहून घेतला आहे. अरब देशांमधील सर्वात पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.
पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याआधी त्यांनी शिक्षणमंत्री म्हणूनदेखील काम केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये बरीच भरीव कामे केली आहेत. आंतरराष्ट्रीय पॉलिसीज तसेच शैक्षणिक बदल या क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी देखील त्यांनी काम केले होते.
ट्युनिशियाच्या हायर एज्युकेशन रिफॉर्म प्रोजेक्टवर त्यांनी 2016 ते 2021 या काळामध्ये लक्षवेधी काम केले होते. आणि याचमुळे प्रेसिडंट कैस यांनी पंतप्रधान पदासाठी त्यांचा विचार केला. असे खुद्द प्रेसिडेंट कैस यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. त्याचप्रमाणे ते म्हणतात की, देशात वाढत जाणारा कोरोना आणि त्यामुळे निर्माण होणारी बिकट आर्थिक परिस्थिती यावर मात करता यावी म्हणून नजला यांची पंतप्रधानपदी झालेली नियुक्ती खूप आशादायी आहे.
Najla Bouden Romdhane, First female prime minister from arab countries
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय
- राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र -“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा , पंचनामे तातडीने सुरू करावेत , शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत द्या “
- जगातील मोठा भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार ; स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकला मोठे स्वागत
- कपिल सिब्बल यांच्या घराबाहेर आंदोलनावर आनंद शर्मा यांची टीका, म्हणाले – सोनिया गांधींनी दोषींवर कारवाई करावी