• Download App
    म्यानमारमधील स्थलांतराची आत्ता कुठे सुरुवात, भारतापुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची भिती | Myanmar condition worsened

    म्यानमारमधील स्थलांतराची आत्ता कुठे सुरुवात, भारतापुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची भिती

    विशेष प्रतिनिधी

    जीनिव्हा – म्यानमारमध्ये लष्करी बंडानंतर नागरिकांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिक थायलंड आणि भारताच्या सीमा ओलांडत बेकायदा स्थलांतर करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या म्यानमारबाबतच्या विशेष दूत ख्रिस्टीन बर्गनर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. स्थलांतराची ही केवळ सुरुवात असू शकते असा इशाराही दिला आहे. Myanmar condition worsened

    म्यानमारमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यांची आज बंद दाराआड चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक समुदायाने ठोस प्रयत्न करणे आवश्यथक असून आशियातील देशांनी आपला प्रभाव वापरून म्यानमारमध्ये स्थैर्य आणणे आवश्यरक असल्याचे बर्गनर यांनी सदस्यांना सांगितले.



    सुरक्षा परिषदेत बोलताना म्यानमारमधील हिंसाचाराचा भारताने निषेध केला. देशातील हिंसाचार थांबावा आणि राजकीय नेत्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली आहे. म्यानमारमधील परिस्थितीवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला जावा, असे सांगतानाच भारताने म्यानमारमधील राखीन प्रांताच्या विकासासाठी हातभार लावण्याचीही तयारी दर्शविली.

    Myanmar condition worsened

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या