• Download App
    ब्रिटनमध्ये चक्क चर्चमध्येच खासदारावर जीवघेणा चाकूहल्ला, खासदाराचा मृत्यू|MP killed in Briton by stabing in church

    ब्रिटनमध्ये चक्क चर्चमध्येच खासदारावर जीवघेणा चाकूहल्ला, खासदाराचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – ब्रिटनमधील सत्ताधारी कॉन्झर्व्हेणटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अमेस (वय ६९) यांच्यावर चाकूहल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. पूर्व इंग्लंडमधील चर्चमध्ये हल्ला करणाऱ्या २५ वर्षांच्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.MP killed in Briton by stabing in church

    ली-ऑन-सी येथील चर्चमध्ये नियमित बैठक सुरू असताना अमेस यांच्यावर हल्ला झाला. संशयित हल्लेखोराला अटक केली असून त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे. संशयित हल्लेखोर ब्रिटनचा नागरिक आहे. इस्लामी दहशतवादी संघटनेशी त्याचा संबंध आहे.



    तपास पथक लंडनमधील दोन पत्त्यावर शोध घेत आहेत. अमेस यांच्या हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेने सामान्य जनतेला काही धोका नसल्याची ग्वाही पोलिसांनी दिली.

    हल्ल्यानंतर अमेस यांना अडीच तासापर्यंत रुग्णालयात दाखल न केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे स्थानिक नगरसेवक जॉन लँब यांनी सांगितले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अमेस यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला.

    MP killed in Briton by stabing in church

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव