भडकाऊ भाषणे करून मुस्लिमांची माथी भडकावल्याच्या कारणावरून पॅरीसमध्ये एक मशीद बंद करण्यात आली आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात असणाऱ्या एका मशिदीत इमामांकडून तिथं जमणाऱ्या अनुयायांना कट्टरतावादी भाषणं दिली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे देशातील नागरिकांच्या मनात इतर नागरिकांबाबत वैरभावना निर्माण करणं आणि दहशतवादी विचारांना खतपाणी घालणं, असे आरोप ठेवत ही मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Mosques closed as Muslims are provoked by inflammatory speeches
विशेष प्रतिनिधी
पॅरिस: भडकाऊ भाषणे करून मुस्लिमांची माथी भडकावल्याच्या कारणावरून पॅरीसमध्ये एक मशीद बंद करण्यात आली आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात असणाºया एका मशिदीत इमामांकडून तिथं जमणाऱ्या अनुयायांना कट्टरतावादी भाषणं दिली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे देशातील नागरिकांच्या मनात इतर नागरिकांबाबत वैरभावना निर्माण करणं आणि दहशतवादी विचारांना खतपाणी घालणं, असे आरोप ठेवत ही मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मशिदीत नुकतीच एका नव्या इमामांची नियुक्ती करण्यात आली होती. हे इमाम नव्यानेच इस्लाम धर्मात दाखल झाले होते. या मशिदीत मुस्लीम धर्मियांना ख्रिश्चन धर्म, ज्यू धर्म आणि इतर धर्मांबाबत भडकावले जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. देशात एकता आणि सलोखा राखणं गरजेचं असल्याचं सांगत अत्यावश्यक कारवाई म्हणून ही मशीद पुढील 6 महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फ्रान्स सरकारने कट्टरतावादाला तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या मशिदीत सलग काही दिवस हजेरी लावून इथल्या घडामोडींचा आढावा घेतला. त्यावेळी इस्लामचा प्रचार करण्याच्या आडून इतर धर्मियांविषयी तेढ पसरवली जात असल्याचं दिसून आलं. मुस्लीम सोडून इतर सर्व धमार्चे नागरिक हे दुश्मन आहेत, फ्रान्समधील पाश्चिमात्य संस्कृतीविरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे, दुश्मनांचा खात्मा करणं हे आपलं कर्तव्य आहे, वगैरे भाषा वापरली जात असल्याचे दिसून आल्यावर हा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय देशाच्या शांततेसाठी घेण्यात आला असून दहशतवादाला नेहमीच आपला विरोध राहिल, असे फ्रान्सने म्हटले आहे. कट्टरतावाद हा कुठल्याही देशासाठी किती घातक असू शकतो, याची अनेक उदाहरणं जगानं पाहिली आहेत. त्यामुळे कुठल्याही अतिरेकी धार्मिक विचारांना थारा देणं धोक्याचं असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे.
Mosques closed as Muslims are provoked by inflammatory speeches
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेने साधले काम; मुंबई महापालिकेतले ९ प्रभाग वाढविले; विद्यापीठ विधेयकही विधानसभेत मंजूर; पण राज्यपालांची स्वाक्षरी बाकी!!
- हर्षवर्धन पाटलांची लेक बनली ठाकरे परिवाराची सून, अंकिता आणि निहार ठाकरे यांचा विवाह
- रजपूत आणि दाभोळकर केस देखील सीबीआय कडेच आहेत. त्यांचे काय झाले? राज्य सरकार झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत आहे ; रोहित पवार