मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकला, तर भारताची एडलिन कॅसलिनोने टॉप 5 मध्ये स्थान मिळविले आहे. आंद्रियाने यापूर्वी मिस मेक्सिकोचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. मिस मेक्सिको आंद्रिया मेझाने 73 देशांतील सुंदरींना मागे टाकत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. miss mexico andrea meza crowned as miss universe 2021 winner, Miss India Is in Top Five
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकला, तर भारताची एडलिन कॅसलिनोने टॉप 5 मध्ये स्थान मिळविले आहे. आंद्रियाने यापूर्वी मिस मेक्सिकोचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. मिस मेक्सिको आंद्रिया मेझाने 73 देशांतील सुंदरींना मागे टाकत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
मिस युनिव्हर्स 2021 पहिल्या पाचमध्ये मिस इंडिया, मिस ब्राझील, मिस पेरू आणि मिस डॉमिनिक रिपब्लिक यांचा समावेश आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मिस युनिव्हर्स ब्युटी कॉन्टेस्ट झाला नव्हता. यापूर्वी मिस युनिव्हर्सचे विजेतेपद मिस दक्षिण आफ्रिका जोजिबिनी तुन्जीने जिंकले होते.
कोण आहे यंदाची मिस युनिव्हर्स?
मिस युनिव्हर्स 2021 मेक्सिकोची आंद्रिया मेझा आहे. मिस युनिव्हर्स 2021 मेझा चिहुआहुआ पर्यटनाची राजदूत आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. मेझा ही अॅथलेटिक कपडे आंद्रिया मेझा एक्टिव्हवेअरची मालकीनही आहे.
मिस इंडिया एडलिना कॅसलिनो
भारताचे स्वप्न भंगले
भारतीय सुंदरी एडलिन ही टॉप 5 मध्ये स्थान मिळवू शकली. एडलिना विश्वसुंदरी न झाल्याने भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. यावेळी भारत मिस युनिव्हर्सचे विजेतेपद पटकावेल, अशी चाहत्यांना आशा होती. सन 2000 मध्ये भारतातील लारा दत्ता आणि 1994 मध्ये सुष्मिता सेन यांनी हा किताब आपल्या नावावर केला होता.
कोण आहे मिस इंडिया एडलिन कॅसलिनो?
एडलिन कॅसलिनोचा जन्म कुवेतमध्ये झाला होता, परंतु वयाच्या 15व्या वर्षी ती भारतात आली. 22 वर्षीय एडलिन कॅसलिनो शेतकर्यांच्या कल्याणकारी संस्थांसोबत काम करते. एडलिन ही पीसीओएस फ्री इंडिया मोहिमेचा चेहरादेखील आहे. एडलिन महिला आणि एलजीबीटी समुदायासाठीदेखील कार्य करते.
miss mexico andrea meza crowned as miss universe 2021 winner, Miss India Is in Top Five
महत्त्वाच्या बातम्या
- मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ
- DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी
- Narada Sting Case : ममतांचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रतो मुखर्जींना सीबीआयने घेतले ताब्यात, नारदा घोटाळ्याप्रकरणी चौकशी
- WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ