• Download App
    मिस बमबम म्हटली रशियाचे अध्यक्ष पुतीन हे हिंसक मनोरुग्ण, दोन वर्षांपूर्वीच माझा हात दाबला, एकटक बघत राहिले|Miss Bambam says Russian President Putin is a violent psychiatrist who shook my hand two years ago, staring at me.

    मिस बमबम म्हटली रशियाचे अध्यक्ष पुतीन हे हिंसक मनोरुग्ण, दोन वर्षांपूर्वीच माझा हात दाबला, एकटक बघत राहिले

    विशेष प्रतिनिधी

    साओ पावलो : रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान एक मॉडेल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ‘हिंसक मनोरुग्ण’ असल्याचा आरोप मिस बमबम’ या मॉडेलने केला आहे. दोघांची २०१८ मध्ये भेटही झाली होती. यावेळी पुतीन यांनी माझा हात दाबला आणि काही मिनिटांपर्यंत ते एकटक पाहत राहिले. यामुळे मी थोडी घाबरलेही होते असे तिने म्हटले आहे.Miss Bambam says Russian President Putin is a violent psychiatrist who shook my hand two years ago, staring at me.

    व्लादिमीर पुतीन आणि मिस बमबम यांची पहिली भेट २०१८ मध्ये झाली होती. याच भेटीत पुतीन यांनी मिस बमबमला रशिया भेटीचं आमंत्रण दिले. आणि ती प्रत्यक्ष रशियात दाखल झाल्यानंतर खुद्द राष्ट्राध्यक्षांनी तिच्यासाठी यजमानपदही भूषवलं होतं. परंतु, या भेटीनंतर पुतीन हे एक ‘हिंसक मनोरुग्ण’ असल्याचं आपल्या लक्षात आल्याचं मिस बमबमचं म्हणणं आहे.



    सूझी कॉर्टेज ही ब्राझीलची मॉडेल आहे. ‘वर्ल्ड कप इव्हेंट २०१८’साठी ती रशियात दाखल झाली होती. दरवर्षी ब्राझीलमध्ये ‘मिस बमबम’ ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. देशातील सर्वोत्तम नितंब असलेली महिला या स्पधेर्ची विजेती ठरते. ‘मिस बमबम’ स्टार सूझी आणि पुतिन यांची ओळख ब्राझील फुटबॉल कॉन्फेडरेशन कार्यक्रमात झाली होती.

    सूझीला विश्वचषक स्पर्धेदरम्यान पुतीन यांच्यासोबत जेवण घेण्याची संधी मिळाली होती. मात्र या भेटीदरम्यान आपण पुतीन यांच्यामुळे खूप अस्वस्थ झाल्याचं सांगत मिस बमबमनं आपला अनुभव कथन केला.
    पुतीन यांच्या भेटीत त्यांनी माझा हात दाबला आणि काही मिनिटांपर्यंत ते केवळ माज्याकडे एकटक पाहत राहिले.

    यामुळे मी थोडी घाबरलेही. ते आपल्या खुर्चीवर अशा पद्धतीने बसत जणू सिंहासनावरच बसलेले आहेत. त्यांना माझ्याशी काही बोलायचे असेल तर ते ती गोष्ट अगोदर आपल्या सेक्रेटरीला सांगत आणि मग त्यांचा सेक्रेटरी माज्याजवळ येऊन ती गोष्ट मला सांगत होता. या भेटीत पुतीन यांनी माझं खूप कौतुक केलं आणि रशियाला येण्याचं आमंत्रणही दिलं, असं मिस बमबमनं ‘जॅम प्रेस’शी बोलताना म्हटलं.

    Miss Bambam says Russian President Putin is a violent psychiatrist who shook my hand two years ago, staring at me.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या