• Download App
    मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 ची घोषणा! एआयसीटीई ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल | Microsoft has announced virtual internship 2021 program, apply on AICTE TULIP portal before 29 September 2021

    मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 ची घोषणा! एआयसीटीई ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल

    विशेष प्रतिनिधी

    इंडिया : मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 ची घोषणा करण्यात आली आहे. एआयसीटीई ट्यूलिप या पोर्टल वरून इच्छुकाना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे. या इंटर्नशिपसाठी एकूण  50,000 ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि फ्युचर रेडी यांनी हा टॅलेंट प्रोग्राम जाहीर केला आहे. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी ही एक ऑनलाईन इंटर्नशिप प्रोग्रामची संधी आहे.

    Microsoft has announced virtual internship 2021 program, apply on AICTE TULIP portal before 29 September 2021

    अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), FutureSkills Prime-a NASSCOM आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) डिजिटल कौशल्य उपक्रम, अर्न्स्ट अँड यंग (EY), GitHub आणि Quess Corp च्या भागीदारीत ही इंटर्नशिप दिली जात आहे.

    फ्युचर रेडी टॅलेंट ही ऑनलाईन इंटर्नशिप आहे. in-demand azure cloud आणि उद्योग विश्वाशी संबंधित security स्किल शिकण्याची संधी आहे. व्यावसायिक आव्हाने सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही मिळणार आहे.


    मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेटस यांचे कंपनीतच होते अफेअर, विवाहबाह्य संबंधाच्या गौप्यस्फोटाने खळबळ


    ह्या इंटर्न शिपसाठी कोण अप्लाय करू शकतं?

    2022 आणि 2024 या काळात कामावर रुजू होऊ पाहणाऱ्या आणि उच्च शिक्षित असणाऱ्या जवळपास 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ह्या संधीचा फायदा उपलब्ध करून देणे हा मायक्रोसॉफ्टचा हेतू आहे.

    कोणत्याही स्पेशलायझेशन मध्ये डिग्री असणारे विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकतात. 8 आठवड्यांचा पूर्ण वेळ ह्या इंटर्नशिपसाठी देणे आवश्यक आहे. अर्जदारांकडे संबंधित कौशल्ये आणि आवडी असणे आवश्यक आहे.

    मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 साठी अर्ज कसा करावा?

    या संधीसाठी अर्ज करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर 2021 पूर्वी एआयसीटीई ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. अर्जदाराच्या कॉलेजचे नाव, विद्यार्थी आयडी, नाव, राहण्याचे शहर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर देऊन ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इंटर्नशिपसाठी अप्लाय करावे. ज्यांना अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

    https://internship.aicte-india.org/internship-details.php?uid=INTERNSHIP_163185424661441ea6ad128&level=4

    Microsoft has announced virtual internship 2021 program, apply on AICTE TULIP portal before 29 September 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या