विशेष प्रतिनिधी
बार्सिलोना – फुटबॉलचा बादशहा लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना हे दोन दशके रुढ असलेले समीकरण आता संपले आहे. मेस्सी आता बार्सिलोनाचा खेळाडू नसेल असे बार्सिलोना क्लबने जाहीर करताच क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मेस्सीला आता कोणता क्लब करारबद्ध करणार याकडे लत्र लागून राहणार आहे.Messi will not now play for Barcilona club
वयाच्या १८ वर्षापासून मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळलेला आहे. मेस्सीने बार्सिलोनाबरोबरचा अखेरचा करार सप्टेंबर २०१७ मध्ये केला होता त्यानुसार दरवर्षाला त्याला १८ कोटी ८० लाख युरो मिळत होते. कोरोना काळात बार्सिलोनाने मेस्सीसह सर्व खेळाडूंच्या करारात कपात केली होती.
नव्याने करार व्हावा असे बार्सिलोना आणि मेस्सी या दोघांना वाटत होते, परंतु आर्थिक रक्कमेवरून दोघेही एकमेकांपासून दूर झाले आहेत.मेस्सीचा बार्सिलोनाबरोबरचा करार कोपा अमेरिका स्पर्धा सुरू असतानाच संपला होता. बार्सिलोना क्लबची आर्थिक चणचण असल्यामुळे मेस्सीला अपेक्षित रक्कम ते देऊ शकत नव्हते.
Messi will not now play for Barcilona club
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-इस्रायल लष्करी संबंध मजबूत करणार, एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी केली चर्चा
- सीबीआयचे माजी संचालक अलोक वर्मांविरोधात शिस्तभंगाची कारवाई, केंद्रीय गृहविभागाने केली शिफारस
- सरकार चर्चेला तयार पण विरोधकच चर्चेसाठी तयार नाहीत, रविशंकर प्रसाद यांचा आरोप
- गौडबंगाल : आमदार निलेश लंके यांनी मारहाण केल्याची तक्रार लिपीकाने केली आणि परतही घेतली!