• Download App
    डोमिनिका हायकोर्टाने मेहुल चोकसीचा जामीन फेटाळला, पळून जाण्याची व्यक्त केली भीती । Mehul Choksi Bail denied By High Court In Dominica On The Grounds That He Could escape again

    डोमिनिका हायकोर्टाने मेहुल चोकसीचा जामीन फेटाळला, पळून जाण्याची व्यक्त केली भीती

    Mehul Choksi Bail denied By High Court In Dominica : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला डोमिनिका उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. शुक्रवारी कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला. वृत्तसंस्था एएनआयनुसार, चोकसी पळून जाण्याचा धोका असल्याने उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. Mehul Choksi Bail denied By High Court In Dominica On The Grounds That He Could escape again 


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला डोमिनिका उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. शुक्रवारी कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला. वृत्तसंस्था एएनआयनुसार, चोकसी पळून जाण्याचा धोका असल्याने उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे.

    चोकसीचा वकिलांचा युक्तिवाद

    यापूर्वी चोकसीच्या वकिलांनी कोर्टात असा युक्तिवाद केला होता की, कॅरिकॉम नागरिक म्हणून मेहुलला जामीन मिळाला पाहिजे. वकिलांनी असा युक्तिवाद केला की, चोकसीची प्रकृती ठीक नाही. अशा परिस्थितीत सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्यानंतर त्याला जामीन मिळायला हवा.

    त्याचवेळी सरकारी पक्षाने जामिनाचा विरोध करत म्हटले की, चोकसी फ्लाइट रिस्कवर आहे आणि इंटरपोलने त्याच्याविरुद्ध नोटीस जारी केलेली आहे. त्याला जामीन मिळाल्यास तो पळून जाण्याचा धोका कायम राहील. त्यामुळे त्याला जामीन मंजूर होऊ नये.

    यापूर्वी झालेल्या सुनावणीत डोमिनिका उच्च न्यायालयाने चोकसीच्या जामीन अर्जावरील सुनावणी 11 जूनपर्यंत तहकूब केली होती. न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर चोकसीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

    असे आहे संपूर्ण प्रकरण

    मेहुल चोकसी अँटिगा-बार्बुडा येथे राहत होता. परंतु 23 मे रोजी तो अचानक बेपत्ता झाला आणि दोन दिवसांनंतर डोमिनिकामध्ये तो पकडला गेला. चोकसीचा असा दावा आहे की, तो त्याची मैत्रीण बार्बरा जाबेरिकासोबत होता. त्या काळात त्याचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्याला मारहाणही केली, पण या संपूर्ण घटनेदरम्यान जबरिकाने त्याला काहीच मदत केली नाही. यावरून हे स्पष्ट होते की, ती अपहरण रचण्यात सहभागी होती.

    Mehul Choksi Bail denied By High Court In Dominica On The Grounds That He Could escape again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य