• Download App
    डेन्मार्कच्या मॉलमध्ये गोळीबार : हल्लेखोराच्या अंदाधुंद फायरिंगमध्ये 3 ठार; अनेक जखमी|Mall shooting in Denmark 3 killed in indiscriminate firing by assailants; Many injured

    डेन्मार्कच्या मॉलमध्ये गोळीबार : हल्लेखोराच्या अंदाधुंद फायरिंगमध्ये 3 ठार; अनेक जखमी

    वृत्तसंस्था

    कोपनहेगन : डॅनिश शहर कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 22 वर्षीय डॅनिश तरुणाला अटक करण्यात आली आहे.Mall shooting in Denmark 3 killed in indiscriminate firing by assailants; Many injured

    कोपनहेगन पोलिस ऑपरेशन युनिटचे प्रमुख सोरेन थॉमसन यांनी सांगितले की, या घटनेमागे दहशतवादी हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते म्हणाले- या घटनेत आणखी काही लोक सामील आहेत की नाही, याची सध्या तरी माहिती नाही. आम्ही तपास करत आहोत.



    सुटीचा दिवस असल्याने मॉलमध्ये गर्दी

    प्राथमिक माहितीनुसार, फील्ड्स शॉपिंग मॉलमध्ये सुटी असल्याने अनेक लोक येथे उपस्थित असताना ही घटना घडली. यादरम्यान अचानक गोळीबार आणि किंचाळण्याचे आवाज आले. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि लोकांनी बाहेर धाव घेतली.

    मुख्य पोलीस निरीक्षक सोरेन थॉमसन म्हणाले – या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्याहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींचा नेमका आकडा सांगणे घाईचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    22 वर्षीय तरुणाला अटक

    याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कौटुंबिक हिंसाचार आहे की आणखी काही कारण आहे, हे सध्या तरी सांगता येणार नाही. आम्ही बारकाईने तपास करत आहोत.

    Mall shooting in Denmark 3 killed in indiscriminate firing by assailants; Many injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या