• Download App
    इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या भांडणाचे मूळ कारण काय? जाणून घ्या किती जुना आहे संघर्ष! । Know The History and Actual Reason Behind Israeli – Palestinian conflict

    Israeli – Palestinian conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ कारण काय? जाणून घ्या किती जुना आहे संघर्ष!

    Israeli – Palestinian conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. दरवर्षी दोन्ही देशांमध्ये याच महिन्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतात. कारण रमजान महिन्यात पॅलेस्टाईनचे रहिवासी त्यांच्या स्वातंत्र्याचा आवाज उठवत असतात, तर या काळात इस्रायल आपले स्वातंत्र्य साजरे करत आहे. मागच्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरू आहे, यामुळे दोन्ही देशांच्या सर्व जुन्या जखमा ताज्या झाल्या आहेत. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइन का युद्ध करत आहेत, तसेच या दोन्ही देशांचे शत्रुत्व किती जुने आहे, याबद्दल माहिती घेऊया… Know The History and Actual Reason Behind Israeli – Palestinian conflict


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. दरवर्षी दोन्ही देशांमध्ये याच महिन्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतात. कारण रमजान महिन्यात पॅलेस्टाईनचे रहिवासी त्यांच्या स्वातंत्र्याचा आवाज उठवत असतात, तर या काळात इस्रायल आपले स्वातंत्र्य साजरे करत आहे. मागच्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरू आहे, यामुळे दोन्ही देशांच्या सर्व जुन्या जखमा ताज्या झाल्या आहेत. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइन का युद्ध करत आहेत, तसेच या दोन्ही देशांचे शत्रुत्व किती जुने आहे, याबद्दल माहिती घेऊया…

    आता का झाला इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष? (Israeli – Palestinian conflict)

    जेरुसलेममध्ये मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू झाल्यापासून इस्त्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिक यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. रमजानमध्ये मशीद अल-अक्सा येथे येणार्‍या मुस्लिमांची संख्या इतर दिवसांपेक्षा जास्त आहे. इस्रायल पोलिसांनी जेरुसलेम शहरातील दमास्कस गेटला बॅरिकेड केले. मुस्लिम म्हणाले की, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. वाढता विरोध लक्षात घेता पोलिसांनी तेथून बॅरिकेडिंग हटविली, पण वातावरण बिघडण्यामागे हेदेखील एक प्रमुख कारण होते.

    वादाचे आणखी एक कारण जेरुसलेम-डे असल्याचेही सांगितले जात आहे. खरं तर जेरुसलेम डे 1967 च्या अरब-इस्त्रायली युद्धात इस्रायलच्या विजयाच्या उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. इस्त्रायलने 6 दिवसांत हे युद्ध जिंकले आणि पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतला. यावर्षी 10 मे रोजी जेरुसलेम डे साजरा करण्यात आला.

    या दिवशी इस्त्रायली लोकांनी जेरूसलेमकडे कूच केले आणि वेस्टर्न वॉलवर प्रार्थना केली. वेस्टर्न वॉल ज्यू धर्मीयांसाठी एक पवित्र स्थान मानली जाते. या मोर्चादरम्यान हिंसक संघर्षही झाले. 10 मे रोजी इस्त्रायली सर्वोच्च न्यायालयात शेख जरराह येथून 4 पॅलेस्टिनी कुटुंबे बेदखल करण्याच्या प्रकरणाची सुनावणी होणार होती. वाढत्या वादाचा विचार करता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

    मागच्या अनेक दिवसांपासून दररोज पॅलेस्टाइन आंदोलक आणि इस्त्रायली पोलिसांमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष जेरुसलेम शहराच्या जुन्या भागात घडत आहे. तेथे ज्यू, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांची पवित्र स्थळे आहेत. याआताचा संघर्ष रमजानच्या सुरुवातीलाच सुरू झाला, जेव्हा पॅलेस्टिनी नागरिकांच्या वतीने निदर्शने सुरू झाली होती. पॅलेस्टिनी नागरिकांनी जगाने आपले अस्तित्व मान्य करण्याची मागणी केली. हा निषेध रोखण्यासाठी इस्त्रायली पोलिसांनी कारवाई सुरू केली. यातूनच हा सध्याचा संघर्ष उडाला.

    पॅलेस्टाइनच्या वतीने हमास या दहशतवादी संघटनेने जेरूसलेम व इस्रायलच्या शहरी भागात रॉकेट डागले आहेत. यावर इस्रायलकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. परंतु आतापर्यंत या संघर्षात दोन डझनांहून अधिक जणांचे प्राण गेले असून अजूनही हा संघर्ष थांबलेला नाही.

    इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाचे मूळ कारण काय?

    भूमध्य समुद्राच्या काठावर इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनविषयी असा संभ्रम आहे की, दोन्ही देशांमधील लढा हा मुख्यत्वे धार्मिक आहे आणि तो हजारो वर्षांपासून सुरू आहे. तथापि, जर आपण दोन्ही देशांच्या इतिहासाचा अभ्यास केला तर असे मुळीच नाही. उलट हे स्पष्ट होते की, हा लढा फक्त आणि फक्त जमिनीसाठी आणि स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वासाठी आहे, यालाच अनेक वेळा धार्मिक दृष्टिकोनातून पाहण्यात आले आहे.

    इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धाचे अनेक भाग आहेत. 19व्या शतकाच्या सुरुवातीला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हा संघर्ष जास्त चिघळला. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जातात, संपूर्ण कहाणी समजण्यासाठी प्रत्येकाच्या दाव्याकडे पाहण्याची गरज आहे.

    प्रसिद्ध इतिहासकार बेनी मॉरिस यांनी आपल्या ‘द बर्थ ऑफ पॅलेस्टाइन रिफ्यूजी प्रॉब्लम रिव्हिझिटेड’ या पुस्तकात या युद्धाबद्दल लिहिले आहे, “तुर्क साम्राज्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करणाऱ्या पहिल्या महायुद्धाने मध्य पूर्वचे संपूर्ण चित्र बदलले. कारण युद्धानंतर इथल्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना विकसित होऊ लागली. मग इथल्या लोकांनी जगाच्या इतर देशांप्रमाणेच स्वतःच्या देशाची मागणी करण्यास सुरुवात केली.” पुस्तकात असे म्हटले आहे की, “पहिल्या महायुद्धानंतर हा संपूर्ण परिसर ब्रिटनच्या हद्दीत आला, पण जेव्हा ज्यूंनी त्यांच्या स्वतंत्र देशाची मागणी करण्यास सुरुवात केली, तेव्हाच आणखी मागणी सुरू झाली की, जेरुसलेममध्ये ज्यूंसाठी एक जागा तयार केली जावी. ज्याला ज्यू आपले घर म्हणू शकतील. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाशी संबंधित एक भाग 20व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेल्या संघर्षाचे बीज आहे.

    जेरूसलेम इतका वादग्रस्त का आहे? (Actual Reason Behind Israeli – Palestinian conflict)

    जेरूसलेम हे स्थळ तिन्ही धर्मांतील मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू लोकांचे श्रद्धास्थान आहे. येथे अल-अक्सा मशीद आहे. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की प्रेषित मोहम्मद मक्का येथून येथे आले होते. या मशिदीजवळ ‘डोम ऑफ रॉक’देखील आहे. मुस्लिमांच्या मते, प्रेषित मोहम्मद यांनी येथूनच स्वर्गाचा प्रवास केला. मुस्लिम मक्का आणि मदिनानंतर याला तिसरे पवित्र स्थान मानतात.

    जेरूसलेममधील ख्रिश्चनांचे पवित्र ‘द चर्च ऑफ द होली सेपल्कर’देखील आहे. जगभरातील ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणी येशूला क्रूसावर चढवण्यात आले. शिवाय येथे ते ठिकाणही आहे, जेथे येशू पुन्हा जिवंत झाले होते.

    जेरूसलेममध्ये एक वेस्टर्न वॉल आहे. ज्यू धर्मीयांच्या मते, कधीकाळी येथे त्यांचे पवित्र मंदिर होते आणि ही भिंत त्याचा अवशेष आहे. येथेच ज्यूंचे पवित्र स्थान म्हणजे ‘होली ऑफ होलीज’ आहे. ज्यूंचा असा विश्वास आहे की, येथेच इब्राहिमने आपला पुत्र इसाकचे बलिदान दिले. ज्यूंचा असा विश्वास आहे की, जगाची निर्मिती या ठिकाणाहून झाली होती. यामुळेच जेरूसलेम तिन्ही धर्मांच्या पवित्र स्थळांसह वादाचेही कारण आहे.

    1967च्या युद्धामध्ये विजयानंतर इस्राईलने पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतला. तेव्हापासून इस्रायल या संपूर्ण जागेला आपली राजधानी मानत आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय समुदायाचा इस्रायलवर विश्वास नाही. तर पॅलेस्टाईन लोक म्हणतात की, एकदा पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र बनले, तर हीच त्यांची राजधानी असेल.

    काय आहे पॅलेस्टाइनची मागणी?

    पॅलेस्टाईन म्हणतो की, इस्रायलने 1967 पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर परत जाऊन वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र स्थापित करावे. त्याच वेळी इस्त्रायलने पूर्व जेरुसलेमचा आपला दावा सोडून द्यावा, कारण पॅलेस्टाईनला स्वातंत्र्यानंतर त्याला राजधानी बनवायचे आहे.

    काय आहे इस्रायलचे म्हणणे?

    इस्रायल पॅलेस्टाईनच्या मागण्यांना ठामपणे नकार देत आला आहे. इस्राईल जेरूसलेममधून आपला दावा सोडण्यास तयार नाही. त्यांच्या मते, जेरुसलेम ही त्यांची राजधानी आहे आणि हे शहर इस्त्रायलचा अविभाज्य भाग आहे.

    इस्रायल-पॅलेस्टाइनमधील वादाची ठिकाणे

    वेस्ट बँक : वेस्ट बँक इस्रायल आणि जॉर्डनदरम्यान आहे. 1967च्या युद्धानंतर इस्रायलने हे ठिकाण आपल्या ताब्यात ठेवले. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन दोन्हींचाही या भागावर दावा आहे.

    गाझा पट्टी : गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्तदरम्यान आहे. येथे सध्या हमास या सशस्त्र संघटनेचा कब्जा आहे. हा एक इस्रायलविरोधी गट आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने आपले सैन्य गाझा पट्टीतून मागे घेतले होते. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले.

    गोलन हाइट्स : राजकीय व रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा प्रदेश सिरियातील पठार आहे. हे 1967 पासून इस्रायलींच्या ताब्यात आहे. या भागातील व्यापार्‍याच्या मुद्द्यावर शांतता चर्चेसाठी अनेक प्रयत्न झाले आहेत, पण त्यात यश आले नाही.

    Know The History and Actual Reason Behind Israeli – Palestinian conflict

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार