• Download App
    अमेरिकी सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान्यांनी केला जल्लोष, काबूलमधली शाळकरी चिमुरडी म्हणते, भीती वाटत नाही! । Kabul school girl says Not afraid as Taliban celebrate complete independence after US troops departure

    अमेरिकी सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान्यांनी केला जल्लोष, काबूलमधली शाळकरी चिमुरडी म्हणते, भीती वाटत नाही!

    US troops departure : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने पूर्णपणे माघार घेतली आहे. अमेरिकी सैन्याची अखेरची तुकडीही काबूलमधून निघून गेली आहे. यानंतर तालिबान्यांनी काबूलमध्ये ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. परंतु याचबरोबर अफगाणिस्तानातील नागिरकांच्या मनात धडकी भरली आहे. Kabul school girl says Not afraid as Taliban celebrate complete independence after US troops departure


    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने पूर्णपणे माघार घेतली आहे. अमेरिकी सैन्याची अखेरची तुकडीही काबूलमधून निघून गेली आहे. यानंतर तालिबान्यांनी काबूलमध्ये ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. परंतु याचबरोबर अफगाणिस्तानातील नागिरकांच्या मनात धडकी भरली आहे. तालिबानी राजवटीत महिला, मुलींना अनेक बंधने लादली जाण्याची ही भीती आहे. इकडे ऐतिहासिक घडामोडी होत असताना काबूलमध्ये मात्र मंगळवारी नियमितपणे मुले शाळेत गेली होती. वृत्तसंस्था एपीशी बोलताना एका खासगी शाळेतील पाचवीतील चिमुरडी म्हणाली की, “मी तालिबानला घाबरत नाही. मी का घाबरावे?”

    दुसरीकडे, तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या शिक्षण पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. येथे मुलींना आणि महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नसल्याचे तालिबानने म्हटलंय. परंतु त्यांना स्वतंत्र वर्गात शिकवण्यात येईल. आतापर्यंत मुलामुलींचे एकत्र भरत असलेले वर्ग आता भरणार नाहीत.

    तालिबानचे उच्च शिक्षणाचे कार्यवाह अब्दुल बाकी हक्कानी म्हणाले, “अफगाणिस्तानचे लोक शरिया कायद्यानुसार त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवतील. तालिबानला आमच्या इस्लामिक, राष्ट्रीय आणि ऐतिहासिक मूल्यांशी सुसंगत इस्लामिक अभ्यासक्रम तयार करायचा आहे. यातूनच इतर देशांशी स्पर्धा करण्यास सक्षम होऊ,” असेही हक्कानी म्हणाले.

    अनेकांनी तसेच अनेक महिलांनी तालिबानच्या आश्वासनांवर शंका व्यक्त केली आहे. महिलांच्या हक्कांमध्ये केलेल्या सुधारणांचा ते आदर करतील का की केवळ त्यांच्या इस्लामिक कायद्याच्या कडक नियमानुसार चालतील? असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. तालिबानने ऑगस्टच्या मध्यात अशरफ घनी यांच्या पाश्चिमात्य समर्थित सरकारला पराभूत करून सत्ता काबीज केली आणि त्यांच्या आधीच्या कार्यकाळापेक्षा वेगळ्या पद्धतीने शासन करण्याचे जाहीर केले. पूर्वीच्या तालिबानी राजवटीत, मुली आणि स्त्रियांना शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती, शिवाय त्यांना मुलगा नसला तरी पुरुष नातेवाईकाशिवाय महिलांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. जो कोणी याचे उल्लंघन करायचा त्याला क्रूर शिक्षा देण्यात यायची.

    Kabul school girl says Not afraid as Taliban celebrate complete independence after US troops departure

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य