• Download App
    'डब्ल्यूएचओ'च्या इशाऱ्यानंतर जपानमधील ऑलिम्पिक धोक्यात|Japan Olympic in danger after WHO warning

    ‘डब्ल्यूएचओ’च्या इशाऱ्यानंतर जपानमधील ऑलिम्पिक धोक्यात

    जपानमध्ये गेल्यावर्षी 2020 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार होती. परंतु, जगभर उसळलेल्या कोविड-19 या चिनी विषाणूच्या साथीमुळे ही जागतिक स्पर्धा स्थगित करावी लागली. ऑलिम्पिक 2021 मध्ये भरवण्याचे जपानने निश्चित केले. मात्र यावर्षीच्या सुरवातीपासूनच चिनी विषाणूने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे ऑलिम्पिकच्या निमित्ताने जगभरातून खेळाडू, प्रशिक्षक, पंच, अधिकारी अशी मोठी गर्दी जपानमध्ये जमवू नये असे जनमानस जपानमध्ये तयार होऊ लागले आहे. जपानी नागरिकांच्या वाढत्या ऑलिम्पिक विरोधाला बळ देणारा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनेही दिलाय. काय म्हणाली जागतिक आरोग्य संघटना? Japan Olympic in danger after WHO warning


    वृत्तसंस्था

    जिनिव्हा : सन 2019 च्या अखेरीस चीनमध्ये कोविड-19 या अर्थात कोरोना या विषाणूचा उद्रेक झाला. पाहता पाहता अवघ्या काही आठवड्यांमध्ये हा विषाणू जगभर पोहोचला. सन 2020 मध्ये या चिनी विषाणूमुळे ‘न भूतो’ अशी जगाची अवस्था झाली. लाखो लोक कोरोनाबाधित झाले,

    हजारो लोकांचे बळी देशोदेशी गेले. मात्र सन 2020 हे कोरोना उद्रेकाचे वर्ष बरे म्हणायची पाळी सध्या जगावर आली आहे. कारण गेल्यावर्षीच्या तुलनेत 2021 हे वर्ष जगासाठी अधिक प्राणघातक ठरले आहे.



    जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)च्या तज्ज्ञांनी एक गंभीर इशारा दिला आहे. संघटनेचे संचालक जनरल टेड्रस गेब्रेयसिस म्हणाले की, “कोरोना महामारीचे दुसरे वर्ष पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक घातक आहे.

    ” ऑलिम्पिक 2021 चे यजमान असणाऱ्या जपानमध्ये आधीच या स्पर्धेला विरोध सुरु झाला असताना डब्ल्यूएचओकडून हे वक्तव्य आले आहे. यामुळे जपानमधील ऑलिम्पिक विरोध आणखी तीव्र झाला आहे.

    वास्तविक गेल्यावर्षीच्या निराशेनंतर जपानने पुन्हा नव्या उत्साहाने यंदा ऑलिम्पिक आयोजनाची तयारी चालवली आहे. मात्र अलिकडच्या अवघ्या दहा आठवड्याच म्हणजे सुमारे अडीच महिन्यात जपानमधल्या तीन राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

    त्यामुळे साडेतीन लाख स्वाक्षऱ्या असलेली याचिका दाखल करत जपानी नागरिकांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. जपानची आर्थिक राजधानी टोकियो आणि इतर परिसरात यापूर्वीच मेअखेरपर्यंत आणिबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

    या आणिबाणीत आता हिरोशिमा, ओकायामा आणि उत्तर होकिआदा या भागांची भर पडली आहे.कोरोनाच्या या चौथ्या लाटेमुळे जपानच्या आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. टोकियोच्या गव्हर्नरपदाचे एकेकाळचे उमेदवार किंजी उत्सोनोमिया यांनी जगण्याला प्राधान्य द्या,

    असे आवाहन ऑलिम्पिक आयोजकांना केले आहे. राजधानीतल्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे त्यांनी ऑलिम्पिक रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे. एएफपीच्या ताज्या आकडेवारीनुसार चिनी विषाणूने आत्तापर्यंत जगात 33 लाख 46 हजार 813 बळी घेतले आहेत.

    तैवान, तैपेई या पुर्वेकडील आशियाई देशांमध्येही चिनी विषाणूचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर जपानमध्ये ऑलिम्पिकला विरोध वाढत असला तरी अजून तरी जपान सरकारने या संदर्भात सकारत्मकता कायम ठेवत क्रीडा स्पर्धा घेण्याच्या दिशेने वाटचाल चालू ठेवली आहे.

    Japan Olympic in danger after WHO warning

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या