विशेष प्रतिनिधी
टोकियो : जपानमध्ये लसीकरण मोहीम संथगतीने होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटीपेक्षा अधिक असताना आतापर्यंत २१ लाखापर्यंतच लसीकरण झाले आहे.japan hits due to less vaccination
जगात कोविडची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे. जपानमध्ये वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी भारत दौरा रद्द केला आहे. त्याचबरोबर फिलपिन्सचा दौरा देखील रद्द केला आहे.
पंतप्रधान सुगा हे जपानमधील कोरोना रोखण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहेत. कोरोनामुळे टोकियो, ओसाका आणि ह्योगो प्रांतात स्थिती बिघडत आहे. यामागे जपानमध्ये संथगतीने होत असलेले लसीकरण कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
जपानमध्ये आतापर्यंत २० लाख ५४ हजार ८८० जणांना लस देण्यात आली आहे. देशाची लोकसंख्या १२ कोटी ६१ लाख असताना आतापर्यंत १ टक्के नागरिकांना पहिला डोस तर ०.६ टक्के नागरिकांना दोन्ही डोस दिले आहेत. संसर्गामुळे येत्या २३ जुलैपासून सुरू होणारी ऑलिंपिक स्पर्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.