विशेष प्रतिनिधी
युनायटेड किंग्डम: जेम्स बॉण्ड बनुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या अभिनेता डॅनियल क्रेगला ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॅनियल क्रेगने 007 चा रोल आत्तापर्यंत पाच बॉण्ड चित्रपटांमध्ये केलेला आहे. गेली १५ वर्षे डॅनियल क्रेग बोंड साकारत आहे व चित्रपट निर्माते रॉयल नेव्ही तसेच डिफेन्स मिनिस्ट्री बरोबर काम करत आले आहेत.
James Bond Daniel Craig appointed as Honorary Commander in British Royal Navy
जेम्स बॉण्डच्या ऑफिशियल ट्विटर पेजवर डॅनियल क्रेगला रॉयल नेव्ही कमांडर घोषित करण्यात आल्याची पोस्ट केली गेली. डॅनियलने याबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ‘नो टाईम टू डाय’ हा बोंड सिरीज मधील 25 वा चित्रपट आहे. हा क्रेगचा शेवटचा चित्रपट असणार आहे.
कारकिर्दीतील दुसरा एमी अवॉर्ड जिंकला केट विन्स्लेटने! मेयर ऑफ ईस्टटाऊन या सीरिजसाठी मिळाला अवॉर्ड
हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. यामध्ये लशाना लिंच नवीन 007 एजंट असेल. त्याचबरोबर रेमी मालेक (Rami Malek) आणि लिया सायडॉक्स यांच्याही मुख्य भूमिका असतील.
James Bond Daniel Craig appointed as Honorary Commander in British Royal Navy
महत्त्वाच्या बातम्या
- जे मुख्यमंत्री बदलण्यासाठी पक्ष बदलतात, मंत्री जास्त काळ आठवत नाहीत : नितीन गडकरी
- काबूलमध्ये तालिबानकडून आता महिलांना काम करण्यास देखील मनाई
- PM MODI US VISIT : भारतासोबत भागीदारीचा अभिमान ! भारतात अविश्वसनीय संधी-पाहा मोदींसोबत बैठकीनंतर काय म्हणाले CEO ….
- राज्यातील घोटाळ्यांच्या महामेरूंचे भ्रष्टाचार बाहेर काढणे, हाच आमचा एककलमी कार्यक्रम – दरेकर