विशेष प्रतिनिधी
जेरूसलेम : गाझा युध्दाच्या काळात शत्रुच्या एकाही रॉकेटला इस्त्रायलच्या भूमीत येऊ न देणाऱ्या आयर्न डोमपेक्षाही ताकदवान क्षेपणास्त्रभेदी प्रणाली इस्त्रायलने विकसित केली आहे. मासिव्ह इन्फ्लेटेबल मिसाईल डिटेक्टर प्रणालीची चाचणी सुरू केली आहे. उंचीवर लांब पल्याचे धोके ओळखण्यासाठी ही प्रणाली वापरली जात आहे.Israel develops missile system more powerful than Iron Drum,
हाय अवेलिबिलिटी एअरो सिस्टम विशाल विमान किंवा जेपलिन ( हलक्या गॅसवर उडू शकणारे विमान) सारखी आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही जगातील अशा प्रकारची सर्वांत मोठ्या प्रणालींपैकी एक आहे.
इस्रायलची सरकारी कंपनी इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने अमेरिकी कंपनी टीसीओएमच्या भागीदारीत बनविले आहे. इस्रालयने इराण, लेबनॉनमध्ये सक्रिय कट्टरपंथी संघटन हिज्बुल्ला व गाझामधील हमासच्या संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी मागील काही वर्षांत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गाझा युद्धाच्या कालावधीत हमासने तेल अवीवच्या आयर्न डोम संरक्षण प्रणालीला भेदण्यासाठी मोठ्या संख्येने रॉकेट डागले होते; परंतु त्यापैकी ९० टक्के रॉकेट निष्प्रभ करण्यात आले होते. याच्या उत्तरात इस्रायलने म्हटले आहे की, आम्ही दहशतवाद्यांना निशाणा बनवित आहोत. संयुक्त राष्ट्रांकडील आकडेवारीनुसार, या लढाईत २५० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून, यात १२९ सर्वसामान्य नागरिक होते. या दरम्यान १३ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला.
Israel develops missile system more powerful than Iron Drum,
महत्त्वाच्या बातम्या
- अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?