• Download App
    गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार |Israel attacked Palestine once agian

    गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार

    विशेष प्रतिनिधी

    जेरुसलेम : इस्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत केलेल्या बाँबवर्षावात २३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांमधील हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे. इस्राईलच्या बाँबवर्षावात गाझा शहरातील तीन इमारती जमीनदोस्त झाल्या.Israel attacked Palestine once agian

    दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महंमद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अमेरिकेने मध्यस्थी करून इस्राईलकडून होणारे हल्ले थांबवावेत, अशी विनंती अब्बास यांनी बायडेन यांच्याकडे केली.



    इस्राईलकडून कराराचा भंग केला जात असून ते घुसखोरी करत आहेत, असा दावाही अब्बास यांनी केला.गेल्या दोन दिवसांत इस्राईलने तिसऱ्यांदा मोठा हवाई हल्ला केला आहे. हमासचे जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या इराद्यानेच हे हल्ले सुरु आहेत.

    हमासनेही इस्राईलच्या विविध शहरांवर रॉकेटचा मारा सुरुच ठेवला आहे. दोन बाजूंमधील तणाव कमी करण्यासाठी इजिप्त, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी इस्राईलमध्ये दाखल झाले आहेत.

    मात्र, एकमेकांना अद्दल घडविण्याच्या भावनेने दोन्ही बाजूंकडून संघर्षाला आणखी धार आणली जात आहे. इस्राईलच्या हल्ल्यांमध्ये काल अनेक आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांची कार्यालये असलेली इमारतही नष्ट झाली.

    पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेकडूनही इस्राईलमध्ये रॉकेटचा मारा सुरुच आहे.हमासच्या म्होरक्यांना लक्ष्य करत इस्राईलने हवाई हल्ले सुरु ठेवले आहेत. आजच्या हल्ल्यात हमासच्या एका मुख्य म्होरक्याचे घर उद्ध्वस्त करण्यात आले.

    Israel attacked Palestine once agian

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही