विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये सर्व काही ठिक होईल, असा विश्वा स पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काबूलमध्ये आले असून सरकार स्थापनेबाबत तालिबानशी ते चर्चा करत आहेत.ISI chief land in Kabul for govt. formation
हमीद यांनी एक ध्वनिचित्रफित प्रसिद्ध करत त्यांच्या दौऱ्याची माहिती दिली. ‘अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोणीही काळजी करू नये, सर्व काही ठिक होईल,’ असे हमीद यांनी सांगितले.
हमीद हे येथे तालिबानी म्होरक्यांशी चर्चा करणार असून त्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान दरम्यानच्या सुरक्षा, व्यापार आणि इतर मुद्द्यांबाबत चर्चा अपेक्षित आहे.दरम्यान अफगाणिस्तानचे भवितव्य ठरविण्यासाठी तेथे निवडणूक घ्यावी, अशी सूचना इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केली आहे.
अमेरिका आणि पाश्चिगमात्य देशांचे सैनिक निघून गेल्याने अफगाणिस्तानात आता तरी शांतता नांदेल, अशी आशाही रईसी यांनी व्यक्त केली. रईसी यांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून भाषण करताना अफगाणिस्तानमधील नागरिकांनी मतदानाद्वारे त्यांचे सरकार निवडावे, असा सल्ला दिला. तेथील सरकार जनतेच्या पसंतीचे असावे आणि त्यांच्या इच्छेनुसार चालणारे असावे, असे रईसी म्हणाले.
ISI chief land in Kabul for govt. formation
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची खरोखरच गरज आहे का? भारतीय संशोधकाने केले एआय टूल विकसित
- कोरोना लसीकरणात भारत जगात अव्वल, विकसित राष्ट्रांच्या जी-७ देशांनी मिळून ऑगस्टमद्ये दिले १० कोटी डोस तर भारतामध्ये एकाच महिन्यात १८ कोटी
- पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्सकडून तालीबानला जबरदस्त दणका, ६०० तालीबानी ठार
- गांधी परिवारात प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा पण विरोध करत वरिष्ठ नेते म्हणतात ते तर फुस्स बॉँब