iraq baghdad sadra market bomb blast : मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण ईद-उल-अजहा (Eid-ul-Azha)अवघ्या काही तासांवर आलेला असताना आज इराकमधील राजधानी बगदादच्या सद्र शहरात एका गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. बकरी ईदच्या एक दिवस आधी हा विस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना यामध्ये टार्गेट करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही, पण यापूर्वी अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेटने जबाबदारी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. iraq baghdad sadra market bomb blast before eid ul azha more than 30 people killed
वृत्तसंस्था
बगदाद : मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण ईद-उल-अजहा (Eid-ul-Azha)अवघ्या काही तासांवर आलेला असताना आज इराकमधील राजधानी बगदादच्या सद्र शहरात एका गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. बकरी ईदच्या एक दिवस आधी हा विस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना यामध्ये टार्गेट करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही, पण यापूर्वी अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेटने जबाबदारी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
एप्रिल महिन्यातही सद्र शहर कार बॉम्ब ब्लास्टने हादरलं होतं. यामध्ये किमान 4 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इराकी सैन्याच्या माहितीनुसार पंतप्रधान मुस्तफा अल कदिमी यांनी बाजार क्षेत्रासाठी जबाबदारी असलेल्या संघीय पोलीस रेजिमेंटचे कमांडर यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी तपासदेखील सुरू असल्याचं म्हटलं आहे. यावर्षी बाजारात अशाप्रकारे बॉम्बब्लास्ट होण्याची ही तिसरी घटना आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सद्र शहराच्या बॉम्ब हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 8 महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. बाजार परिसर रक्ताचा सडा पडला असून अतिशय भीतिदायक दृश्य दिसून आले.
iraq baghdad sadra market bomb blast before eid ul azha more than 30 people killed
महत्त्वाच्या बातम्या
- 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : 11वी प्रवेशासाठीच्या CET चे वेळापत्रक जाहीर, अशी असेल प्रक्रिया
- Saamana Editorial : स्वातंत्र्यलढ्यावेळी असणारा हिंमतवाला काँग्रेस पक्ष आता उरला नाही, सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या, संघाची केली स्तुती
- ब्रिटनमध्ये मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल, अनलॉकची प्रक्रिया सुरू
- कोरोनापाठोपाठ आता ब्रिटनमध्ये नोरो व्हायरसचा वेगाने होतोयं प्रसार
- रुग्णालये आता रिअल इस्टेटसारखा व्यवसाय, तेथे छापले जातात कवळ पैसे – सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे