• Download App
    INTERNET DOWN : अवघ्या जगात ठप्प झाले इंटरनेट, अनेक दिग्गज कंपन्यांपासून ते यूकेची सरकारी वेबसाइट झाली बंद । internet down Worlwide as CDN Provider Fasltly Faces Problem, several big websites including uk gov crashed

    INTERNET DOWN : अवघ्या जगात ठप्प झाले इंटरनेट, अनेक दिग्गज कंपन्यांपासून ते यूकेची सरकारी वेबसाइट झाली बंद

    INTERNET DOWN :  जगातील अनेक दिग्गज वेबसाइट्स क्रॅश झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या यादीत ज्या वेबसाइट्स क्रॅश झाल्या त्यात Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk आणि न्यूज आउटलेट द गाडियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, फाइनान्शियल टाइम्ससहित अनेक लोकप्रिय वेबसाइट्स सध्या समस्येचा सामना करत आहेत. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडरमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. internet down Worlwide as CDN Provider Fasltly Faces Problem, several big websites including uk gov crashed


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगातील अनेक दिग्गज वेबसाइट्स क्रॅश झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या यादीत ज्या वेबसाइट्स क्रॅश झाल्या त्यात Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk आणि न्यूज आउटलेट द गाडियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, फाइनान्शियल टाइम्ससहित अनेक लोकप्रिय वेबसाइट्स सध्या समस्येचा सामना करत आहेत. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडरमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    अनेक वेबसाइट्सवर 503 एरर

    यामध्ये प्रसिद्ध मीडिया कंपनी न्यूयॉर्क टाइम्स आणि यूके सरकारच्या वेबसाइटचाही समावेश आहे. या वेबसाइट्स लोड होत नाहीत आणि यूजर्सना सातत्याने एरर दिसून येत आहे. मीडिया वेबसाइट इंडिपेंडेंटलाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. असे मानले जात आहे की, हे सर्व क्लाउड कम्प्यूटिंग कंपनी Fastly मुळे होत आहे. ही कंपनी या वेबसाइट्सना सर्व्हिस देते. वेबसाइट ओपन होताच एरर कोड 503 दिसत आहे.

    या वेबसाइट्स झाल्या बंद

    या यादीत ज्या वेबसाइट्स सध्या काम करत नाहीत, त्यांचे नाव अशा प्रकारे आहे… stackoverflow, रेडिट, ट्विट्च, गिटहब, क्वोरा, अमेझॉन वेब सर्व्हिस, शॉपिफाई, ट्विटर, अमेजॉन, Vimeo,गुगल, Spotify, गुगल ड्राइव, मेगा, एअरटेल, पेपल, यूट्यूब, स्पीडटेस्ट, फ्रीफायर, इन्स्टाग्राम, व्होडाफोन, गुगल मीट, जियो, गुगल मॅप्स, एक्साइटेल, बीएसएनएल, वॉट्सअप, लाइन, Hulu, जीमेल, नेटफ्लिक्स, अॅक्ट, आयडिया, स्टीम.

    फास्टलीमुळे जगभरात समस्या

    कंटेंट डिलीव्हरी नेटवर्क म्हणजेच सीडीएन इंटरनेटचा पायाभूत भाग आहे. या कंपन्या वेब सेवांच्या प्रदर्शन आणि उपलब्धतेत सुधारासाठी सर्व्हरच्या जागतिक नेटवर्कचे संचालन करतात. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही समस्या CDN (कंटेंट डिलिवरी नेटवर्क) प्रोवायडर Fastly मुळे आली आहे.

    सीडीएन प्रॉक्सी सर्व्हरच्या रूपात काम करते आणि काही डेटाला शेवटच्या युजरच्या जेवढे शक्य असेल Cache करते. उदाहरणार्थ, मीडिया कंटेंटला नेहमी तुमच्याजवळील एका सीडीएन सर्व्हरवर Cached केले जाते जेणेकरून जेव्हाही एखादा युजर वेब पेज लोड करेल तेव्हा त्याला ओरिजिनल सर्व्हरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

    internet down Worlwide as CDN Provider Fasltly Faces Problem, several big websites including uk gov crashed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य