विशेष प्रतिनिधी
लंडन : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फौंडर बिल गेट्स यांनी मागे जेफ बेझोस आणि इलॉन मस्क यांना त्यांच्या स्पेस रिसर्चवर करण्यात येणाऱ्या मोठं मोठ्या गुंतवणूकिवरून टार्गेट करताना म्हटले होते की, अंतराळ संशोधनात पैसे गुंतवण्यापेक्षा पृथ्वीवर असणाऱ्या गरिबी, उपासमार, स्वच्छ वातावरण आणि आरोग्याच्या सेवासुविधा यांच्यासाठी पैसे खर्च करणे केव्हावी उत्तम असेल.
Instead of finding place to live in a space,we must focus on saving earth : prince williams the duke of cambridge
आता बिल गेट्स यांच्या मागोमाग प्रिन्स विल्यम्स – द दुक ऑफ केम्ब्रिज यांनी वक्तव्य केले आहे की, सध्या आपण जिथे राहतो त्या पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ना की अंतराळामध्ये जाऊन तिथे संशोधन करून राहण्यायोग्य कोणती जागा शोधणे यामध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. पहिल्या अर्थ शॉर्ट पुरस्काराचे वितरण समारंभामध्ये बीबीसी न्यूज कास्ट या वाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९६० च्या दशकामध्ये अमेरिका चंद्रावर लवकरात लवकर मनुष्याला पाठवण्यात यश मिळवून दाखवेल असे विधान केले होते. आणि त्यांच्या या इच्छेला ‘मुनशॉट अँम्बिशन’ असे संबोधले जात होते. आणि त्यावरूनच या पुरस्काराचे नाव ‘अर्थ शॉर्ट’ असे ठेवण्यात आले आहे. हा पुरस्कार पृथ्वीवरील प्रोब्लेम्सवर काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. ऑक्टोबर 2020 मध्ये ह्या पुरस्कारांनी सुरुवात झाली होती.
इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीमार्फत नुकताच अमेरिकेच्या सहा सामान्य नागरिकांना अंतराळ सफरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर जेफ बेझोस यांच्या अंतराळ संशोधन कंपनी मार्फत हॉलीवूडचे ऍक्टर विल्यम शॅटनर यांनाही अंतराळ सफरीस पाठवण्यात आले होते. अंतराळात जाणारी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांनी मानही मिळवला आहे.
रिचर्ड ब्रॅन्सन, इलॉन मस्क, जेफ बेझोस असे मोठमोठे अब्जाधीश लोक अंतराळ संशोधनामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रिन्स विलियम यांनी म्हटले आहे की, पृथ्वीवर होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे, ढासळणाऱ्या वातावरणाच्या समतोलासाठी काम करणारे ग्रेट माइंड्स आणि ब्रेन्सची गरज सध्या पृथ्वीला आहे.
Instead of finding place to live in a space,we must focus on saving earth : prince williams the duke of cambridge
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद; परळीत कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता आला नाही
- दसरा मेळाव्यासाठी संघ दक्ष, नागपुरात जय्यत तयारी ; सरसंघचालक डॉ. भागवत यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी
- बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप
- नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका