वृत्तसंस्था
बगदाद : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या बगदाद येथील घरावर ड्रोनद्वारे हल्ला झाला आहे. या हल्ल्यातून ते सुरक्षित बचावले आहेत. परंतु हल्ल्यांमध्ये काही लोक जखमी झाले आहेत. ड्रोन हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. Injuries reported after drone attack on Iraqi PM Mustafa al-Kadhimi’s residence in Baghdad: Al Arabiya
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या ग्रीन झोन बगदाद येथील घरावर रविवारी सकाळी ड्रोनद्वारे हल्ला झाला. ड्रोनद्वारे स्फोट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे इराक लष्कारानं सांगितलं. या हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी पूर्णपणे सुरक्षित आहेत. इराक लष्कराकडून हल्लेखोराचा शोध सुरु आहे.हा हल्ला नेमका कुणी आणि का केला? याबाबतची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी ट्विट करून सुरक्षित असल्याची माहिती दिली. देशासाठी शांती ठेवा, असे अवाहन त्यांनी ट्वीटद्वारे इराकच्या जनतेला केले. मार्च 2020 मध्ये मुस्तफा अल-कदीमी यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारली होती.
Injuries reported after drone attack on Iraqi PM Mustafa al-Kadhimi’s residence in Baghdad: Al Arabiya
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच