वृत्तसंस्था
मॉस्को :रशिया-युक्रेन युद्धाचा २९ वा दिवस आहे. रशियाने युक्रेनमधील मानवतावादी परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला मसुदा सादर केला. तटस्थतेचे धोरण कायम ठेवत भारताने पुन्हा मतदान करणे टाळले. भारतासह १३ देशांनी या मसुद्यावर मतदानात भाग घेतला नाही. तर चीन आणि रशियाने याला पाठिंबा दिला. India’s neutral role in Russia Ukraine war; did not participate in the vote on the Russia draft
दुसरीकडे, इस्रायलने रशियाच्या नाराजीची भीती दाखवून गुप्तचर सॉफ्टवेअर पेगासस स्पायवेअर युक्रेनला देण्यास नकार दिला आहे. त्याच वेळी, नाटोने युक्रेनला आण्विक, रासायनिक, जैविक आणि रेडिओलॉजिकल हल्ले टाळण्यासाठी आवश्यक उपकरणे पाठवण्यास सांगितले आहे.
आजचे अपडेट्स…
- राजधानी कीव्हमध्ये रशियन लष्कराच्या गोळीबारात रशियन पत्रकार ओक्साना बौइला ठार झाल्या.
- युक्रेन युद्धाबाबत खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल रशियाने गुगल न्यूज सर्व्हिसवर बंदी घातली
- साडेचार हजार लोकांना मारियुपोल येथून मानवी कॉरिडॉरद्वारे बाहेर काढण्यात आले
- रशियन सैन्याने कृषी यंत्रे नष्ट केल्याचा आरोप
- युक्रेनचे कृषी मंत्री रोमन लेश्चेन्को यांचा पदत्याग
India’s neutral role in Russia Ukraine war; did not participate in the vote on the Russia draft
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi : दिव्यांग चित्रकार आयुष कुंडल याला भेटून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेरित!!
- Specially-Abled Painter : दोन्हीकडे ‘ नरेंद्र ‘!२५ वर्षीय आयुष कुंडलचे फॅन झाले पंतप्रधान मोदी ; माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण-करणार ट्विटरवर फॉलो…
- Dhananjay Munde Vs Karuna Munde : धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि अनेक बायका लपवल्या आहेत;करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप
- PARAMBIR SINGH : परमबीर यांच्याविरुद्ध तक्रारींचा तपास CBI करणार ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्य सरकारला दणका