• Download App
    आता अमेरिकेतही भारतीय महिलांचा हुंड्यासाठी छळ, पोलिसांकडून पतीविरुद्ध तक्रार |Indian women get tortured in USA by her husbund

    आता अमेरिकेतही भारतीय महिलांचा हुंड्यासाठी छळ, पोलिसांकडून पतीविरुद्ध तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – विवाह करून चार महिन्यांपूर्वीच पतीबरोबर अमेरिकेत गेलेली एक भारतीय महिला येथे हुंडाबळी ठरली आहे. पतीने आपला छळ केल्याचा आरोप करत या महिलेने सॅनफ्रान्सिस्को येथील भारतीय वकीलातीकडे पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.Indian women get tortured in USA by her husbund

    गेल्या काही वर्षांत भारतीयांमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अमेरिका सरकारने भारतीय दूतावासाला तक्रार निवारणासाठी एक वेगळा विभाग स्थापन करण्यास सांगितले होते.
    पतीकडून मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून तिने भारतातील आपल्या घरी गाऱ्हाणे मांडले.



    ‘माझ्या वडिलांनी सासऱ्यांकडे मदतीसाठी विनंती केली. मात्र, हुंडा दिल्याशिवाय मुलगा घरात घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. मला माझ्या पतीने कोणतेही आर्थिक साह्य न करता दूर केले आहे,’ असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

    मार्चमध्ये अमेरिकेत आल्यावर पतीने मारहाण करण्यास आणि माहेरून हुंडा आणण्यासाठी छळ करण्यास सुरुवात केली. आत्यंतिक छळ होत असल्याने पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिच्या पतीविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र, आपला जीव धोक्यात असल्याचा या महिलेचा दावा आहे. ही महिला सध्या एका नातेवाईकांकडे रहात आहे.

    Indian women get tortured in USA by her husbund

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CBI and UK : सीबीआय आणि यूके क्राइम एजन्सीमध्ये सामंजस्य करार, आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणाला मिळणार गती

    Ukraine : युक्रेनमध्ये झेलेन्स्कींविरोधात निदर्शने; नवीन कायद्याद्वारे भ्रष्टाचारविरोधी संस्थांचे स्वातंत्र्य संपवले

    India UK FTA : भारत अणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी, यूकेची वाहने-ब्रँडेड कपडे स्वस्त होतील