विशेष प्रतिनिधी
बीजिंग – तिबेटमधील ल्हासा आणि नियांगची या दोन शहरांदरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावणार आहे. नियांगची हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागूनच असल्याने चीनच्या या प्रकल्पामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. India worries due to bullet train in China
सिचुआन ते तिबेट या रेल्वे जाळ्याची सुरुवात चेंगडू येथून होते, हे शहर सिचुआन प्रांताची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. याआन हा सगळा प्रदेश कवेत घेत ही रेल्वे कामदो मार्गे ते तिबेटमध्ये प्रवेश करते. यामुळे चेंगडू ते ल्हासादरम्यानचा प्रवासाचा कालावधी ४८ तासांवरून १३ तासांवर येणार आहे.
सिचुआन- तिबेट या रेल्वे प्रकल्पाचाच भाग असलेल्या ल्हासा ते नियांगची या रेल्वे मार्गाची लांबी ४३५.५ किलोमीटर एवढी आहे. १ जुलैला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण होणार असून त्या पार्श्वभूमीवर या नव्या रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. या भागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याच्या चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती मुख्य अभियंते लियू युशियांग यांनी दिली.
किंगघाई ते तिबेटनंतर आता सिचुआन ते तिबेट ही दुसरी रेल्वेसेवा या भागामध्ये येते आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना नव्या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते.
India worries due to bullet train in China
महत्त्वाच्या बातम्या
- सीएम शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले- तुमच्या खोटे बोलण्यामुळे अनेकांनी घेतली नाही लस!
- Mann Ki Baat : टोकियो ओलिंपिक, मिल्खा सिंग आणि कोरोना लसीकरण, वाचा पीएम मोदी देशवासियांना काय म्हणाले!
- उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते टाइमपास करत आहेत, दरेकरांची टीका