विशेष प्रतिनिधी
काबूल : माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह यांच्या घरात सोन्याच्या वीटा, डॉलरची बंडले यासह ६.५ मिलियन डॉलर म्हणजे ४८ कोटी रुपये सापडल्याचा दावा तालीबानने केला आहे. जी रक्कम सापडली ती केवळ एक छोटासा भाग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.In house of former Afghan Vice President Saleh gold bars, 48 crore dollar bundle found, Taliban claim
पाकिस्तानी पत्रकाराने केलेला याबाबतचा केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तालिबान्यांच्या हातात डॉलरचे बंडल आहेत. बाजूला सोन्याच्या वीटाही आहेत.अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांत सोडून संपूर्ण देशावर तालिबानने ताबा केला आहे. या प्रांतात अहमद मसूदची एनआरएफ सेना तालिबानसोबत लढत आहे.
माजी उप-राष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हेही एनआरएफसोबत आहेत आणि ते पंजशीरमधेच थांबले आहेत. तालिबानचे सैनिक त्या घरापर्यंत पोहोचले आहेत जिथे सालेह राहत होते. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने या घराचा व्हिडीओ शेअर केला. ज्यात सांगण्यात आलं आहे की, तालिबान्यांना सालेह यांच्या घरात डॉलर आणि किंमती वस्तू मिळाल्या आहेत. सालेह यांच्या घरी त्यांना ६.५ मिलियन डॉलर(४८ कोटी रुपए) सापडले.
अफगणिस्थानचे राष्ट्रपती अशरफ गनी पळून गेल्यानंतर स्वत:ला देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती घोषित करणारे सालेह यांची इमेज स्वच्छ मानली जाते. याआधी तालिबान्यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो जारी केला होता, ज्यात एक दहशतवादी हातात बंदुक घेऊन त्या लायब्ररीत बसला होता जिथे काही दिवसांपूर्वी अमरूल्लाह सालेह यांनी एक व्हिडीओ बनवून जारी केला होता.
तालिबानने अमरूल्लाह सालेह यांचे भाऊ रोहुल्ला सालेह यांचीही हत्या केली आहे. ते एनआरएफच्या एका यूनिटचे कमांडर होते.सालेह परिवाराचे सदस्य इबादुल्लाह सालेह यांनी सांगितले की, तालिबानने त्यांच्या काकाची हत्या केली. तालिबानने मृतदेहही दफन करू दिला नाही आणि म्हणत आहे की, मृतदेह असाच सडला पाहिजे.
In house of former Afghan Vice President Saleh gold bars, 48 crore dollar bundle found, Taliban claim
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : समुद्र खवळला, खराब हवा; मच्छीमार नौका देवगडमध्ये ; वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी
- WATCH : सिंधुदुर्ग -मुंबई विमान प्रवास २५०० रुपयांत ; राऊत चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रश्न नाही
- सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाचा आदेश राखून ठेवला, केंद्र सरकारने दिला निष्पक्ष समितीचा प्रस्ताव