पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असताना प्लेबॉय म्हणून प्रसिध्द असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे धर्मांध कट्टरतावादी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी बुरखा परिधान करावा, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र, यामुळे इम्रान खान यांच्याविरुध्द संताप व्यक्त होत आहे.Imran Khan, a one-time playboy, has become a bigoted fanatic,He advised that wearing a burqa would reduce rape
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असताना प्लेबॉय म्हणून प्रसिध्द असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे धर्मांध कट्टरतावादी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी बुरखा परिधान करावा,
असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र, यामुळे इम्रान खान यांच्याविरुध्द संताप व्यक्त होत आहे.ऐवढेच नव्हे तर इम्रान खान यांनी यानिमित्ताने भारताविरुध्दची जळजळ पुन्हा एकदा बाहेर काढली आहे.
वाढत्या अश्लीलतेला युरोप आणि भारत हे देश कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांशी संवाद साधताना इम्रान खान म्हणाले, बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज आहे.
प्रलोभनापासून वाचण्यासाठी आपल्याला बुरखा प्रथेला प्रोत्साहन दिले पाहिजे. दिल्लीला बलात्काराची राजधानी समजले जाते तर युरोपमध्ये अश्लीलतेमुळे कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी अश्लीलता कमी करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
इम्रान खान यांच्या सल्यावर सोशल मिडीयावरुन टीकेची झोड उठवण्यात आली आहे. बिकीनी परिधान केलेल्या परदेशी तरुणीसोबत स्विमिंग कॉश्चुम घातलेले इम्रान खान समुद्रातून बाहेर येत असलेला एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावरव्हायरल केला आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलांनी बुरखा परिधान करावा, असा सल्ला दिला.
बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी इम्रान खान सरकारने कडक कायदा केला आहे. या कायद्यानुसार असे दुष्कृत्य करणाºयास औषध देऊन नपुंसक बनवण्याची तरतूद करण्यात आली आहे.