• Download App
    क्वाड गटात सामील झालात तर आपले संबंध खराब होतील, चीनची बांग्लादेशाला धमकी|If you join the quad group, your relations will deteriorate, China threatens Bangladesh

    ‘क्वाड’मध्ये सामील झाल्यास संबंध खराब होतील; चीनची धमकी; पण बांगलादेशने सुनावले, आम्ही अलिप्ततावादी!

    अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्वाड गटात सहभागी झालात तर आपले संबंध खराब होतील, अशी धमकी चीनने बांग्लादेशाला दिली आहे. क्वाड हा गट बिजींगविरोधी गट आहे. त्यामध्ये बांग्ला देशाने जाणे याचा अर्थ चीनच्या विरोधात जाणे असा घेतला जाईल, असेही चीनने म्हटले आहे.If you join the quad group, your relations will deteriorate, China threatens Bangladesh


    विशेष प्रतिनिधी

    ढाका : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्वाड गटात सहभागी झालात तर आपले संबंध खराब होतील, अशी धमकी चीनने बांग्लादेशाला दिली आहे. क्वाड हा गट बिजींगविरोधी गट आहे. त्यामध्ये बांग्ला देशाने जाणे याचा अर्थ चीनच्या विरोधात जाणे असा घेतला जाईल, असेही चीनने म्हटले आहे.

    चीनचे संरक्षण मंत्री जनरल वे फेंगशे यांनी म्हटले आहे की चीन आणि बांग्लादेशाचे राजनैतिक आणि लष्करी पातळीवर संंबंध आहेत. हे संबंध क्वाडमध्ये बांग्लादेश सहभागी झाल्यास बिघडतील.



    चीनने क्वाड देशांच्या क्वाड गटाला विरोध केला आहे.चीनचे राजदूत ली साईद यांनी म्हटले आहे की चार देशांच्या क्वाड या क्लबमध्ये सहभागी होणे बांग्ला देशाच्या हिताचे ठरणार नाही. त्यामुळे चीन आणि बांग्लादेशाच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल.

    बांग्लादेशचे परराष्टÑ मंत्री डॉ. ए. के. अब्दूल मोमीन म्हणाले, बांग्लादेशाची भूमिका ही कायमच अलिप्तवादाची राहिलीआहे. परराष्टÑ धोरणात समतोल राखताना बांग्लादेश या मूल्यांच्या आधारे पुढील निर्णय घेईल.

    If you join the quad group, your relations will deteriorate, China threatens Bangladesh

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या