• Download App
    हौथी बंडखोरांकडून अबूधाबी विमानतळाजवळ ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट, दोन भारतीयांसह तीन जण ठार । Houthi rebel drone strike near Abu Dhabi airport kills three, including two Indians

    हौथी बंडखोरांकडून अबूधाबी विमानतळाजवळ ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट, दोन भारतीयांसह तीन जण ठार

    Abu Dhabi airport : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मोठा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोमवारी तीन मोठे स्फोट झाले. ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. मृतांमध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय अन्य सहा जण जखमी झाल्याची बाबही समोर आली आहे. Houthi rebel drone strike near Abu Dhabi airport kills three, including two Indians


    वृत्तसंस्था

    अबुधाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मोठा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोमवारी तीन मोठे स्फोट झाले. ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. मृतांमध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय अन्य सहा जण जखमी झाल्याची बाबही समोर आली आहे.

    स्फोटांनंतर विमानतळावरही आगीचे लोळ दिसून आले. तथापि, UAE तपास सुरू करण्यापूर्वी, इराण समर्थित हौथी बंडखोरांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या संघटनेने युएईवर हल्ले करणार असल्याचे निवेदन जारी केले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) च्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये विमानतळावर हा स्फोट झाला. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की टँकरला आग लागण्यापूर्वीच आकाशात ड्रोनसारखी आकृती दिसली होती जी दोन वेगवेगळ्या भागात दिसली. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

    हौथीचे प्रवक्ते याह्या सारी यांच्याशी जोडलेल्या एका ट्विटर खात्याने असा दावा केला आहे की येत्या काही तासांत हौथी यूएईवर लष्करी कारवाई करणार आहे. विशेष म्हणजे, संयुक्त अरब अमिराती दीर्घकाळापासून येमेनमधील गृहयुद्धाची झळ सोसत आहे. 2015 मध्ये UAE ने अरब युतीचा एक भाग म्हणून येमेनमध्ये सरकार बदलण्यासाठी हौथी बंडखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली. तथापि, 2019 पासून येमेनमधील UAE चा हस्तक्षेप कमी झाला आहे.

    Houthi rebel drone strike near Abu Dhabi airport kills three, including two Indians

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के