हॉलिवडूचा सुपरस्टार टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियोचे लव्ह लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आहे. 48 वर्षीय हा अभिनेता 28 वर्षीय भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिलला डेट करत असल्याची माहिती समोर आहे. लिओनार्दो डिकॅप्रियो 30 मे रोजी लंडनमधील चिल्टर्न फायर हाऊसमध्ये नीलम गिलसोबत दिसला होता. पेज सिक्सने वृत्त दिले की, यावेळी अभिनेत्याची आई इर्मेलिन इंडेनबिर्केनही त्याच्यासोबत होती. स्वतःला ब्रिटिश पंजाबी मॉडेल म्हणून सांगणारी नीलम गिल गेल्या महिन्यात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. अकादमी पुरस्कार विजेता अभिनेतादेखील त्याच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कार्यक्रमात होता. Hollywood star Leonardo DiCaprio is dating an Indian girl
कोण आहे नीलम गिल?
नीलमने वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिने मोठा नावलौकिक केला. एका दशकापूर्वी, नीलम बर्बेरी मोहिमेत सहभागी होणारी पहिली भारतीय मॉडेल बनली. तिने वोगसारख्या प्रतिष्ठित फॅशन मॅगझिनच्या कव्हरवरही जागा मिळवली आहे. नीलम गिलने नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटनासाठी मुंबईतही हजेरी लावली होती. डिओरच्या भारतातील पहिल्या शोसाठी तिने रॅम्प वॉकही केला आहे.
नीलम गिलचा भारताशी संबंध काय?
नीलम गिलचा जन्म 1995 मध्ये लंडनमध्ये झाला. तिच्या पालकांचा जन्म यूकेमध्ये झाला होता, परंतु तिचे आजी-आजोबा पंजाबमधील होते. नीलमने एका मुलाखतीत खुलासा केला की ती लहान असताना तिचे पालक कसे वेगळे झाले. मॉडेलने शेअर केले की, तिचा तिच्या वडिलांशी कोणताही संवाद नाही. तिची आई आणि सावत्र वडिलांनी तिला आयुष्यात साथ दिली आहे.
यूट्यूबवरही आहे नीलम गिल
नीलम गिल तिच्या YouTube चॅनेलवर गुंडगिरी, नैराश्य आणि आत्मविश्वासासोबत संघर्ष यासारख्या विषयांवर बोलताना दिसते. ती ऑनलाइन ट्रोल्सनाही संबोधित करते. तिच्या व्हिडिओंद्वारे, ती केवळ या विषयांबद्दल जागरूकता पसरवत नाही तर इतरांना त्यांच्या दोषांपासून दूर राहण्यास प्रवृत्तही करते.
Hollywood star Leonardo DiCaprio is dating an Indian girl
महत्वाच्या बातम्या
- सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज
- PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी US संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
- ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, भीषण अपघातात अनेक जखमी
- आळशी आणि नाकर्ते; शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावले