• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात हिंसाचार माजविणाऱ्या हिफाजत- ए -इस्लामच्या नेत्याला रिसॉर्टमध्ये महिलेसोबत मौजमजा करताना पकडले Hifazat-e-Islam leader caught inciting violence during PM Narendra Modi's visit while having fun with a woman at a resort

    मोदींच्या दौऱ्यात हिंसाचार माजविणाऱ्या ‘हिफाजत’च्या नेत्याला महिलेसोबत मौजमजा करताना पकडले; बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी सुनावले, हे लोक इस्लामसाठी कलंक!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश दौऱ्याला विरोध करत देशात हिंसाचार माजविणाऱ्या हिफाजत-ए-इस्लामच्या नेत्याला एका रिसॉर्टमध्ये सुंदर महिलेसोबत मौजमजा करताना पकडण्यात आले. बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत या संघटनेच्या महासचिवाची गैरकृत्ये उघड केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश दौऱ्याला विरोध करत देशात हिंसाचार माजविणाऱ्या हिफाजत-ए-इस्लामच्या नेत्याला एका रिसॉर्टमध्ये सुंदर महिलेसोबत मौजमजा करताना पकडण्यात आले. बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत या संघटनेच्या महासचिवाची गैरकृत्ये उघड केली आहे. Hifazat-e-Islam leader caught inciting violence during PM Narendra Modi’s visit while having fun with a woman at a resort

    देशभरात हिंसाचार पसरवून माजवून  मौज-मजा करण्यासाठी एका सुंदर महिलेसोबत एका रिसॉर्टवर गेले. ते इस्लामच्या नावे कलंक आहेत. हे लोक इस्लामला बदनाम करत आहेत, अशी टीका शेख हसीना यांनी टीका केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात 26 मार्चला बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या दौऱ्याला विरोध करत हिफाजत-ए-इस्लाम नावाच्या संघटनेने हिंसाचार केला होता. तेथील चटगाव आणि ब्राम्हबरिया भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला.



    कट्टरपंथी संघटना हिफाजत-ए-इस्लामचे संयुक्त महासचिव मामूनुल हक याला एका रिसॉर्टमध्ये एका  महिलेसोबत पकडण्यात आले. हक यांच्या सोबत ज्या महिलेला पकडण्यात आले तिला त्यांनी दुसरी पत्नी असल्याचे म्हटले. मामूनुल याला शनिवारी बांगलादेशातील सोनारगावच्या एका रिसॉर्टमध्ये एका महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले होते. यामुळे देशभरात वाच्यता झाल्याने इज्जत वाचविण्यासाठी ते आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक म्हणजे ही महिला ब्युटी पार्लर चालविते. हॉटेलमध्ये जाताना त्यांनी तिला दुसरी पत्नी असे सांगितले होते.

    शेख हसीना यांनी म्हटले की, हिफाजत ए इस्लामने इस्लामचा अवमान केला आहे. रविवारी संसदेत बोलताना त्या म्हणाल्या,  मला त्यांच्या चारित्र्यावर काही बोलायचे नाही. तुम्ही सर्वांनीच त्यांना शनिवारी अपवित्र काम करताना पाहिले आहे. ते नेहमी कर्म आणि धर्माच्या नावावर बोलत असतात. हे लोक इस्लामला बदनाम करत आहेत. इस्लाम माननारा कोणीही व्यक्ती खोटे बोलू शकतो का? असे लोक धमार्चे कसे पालन करतील आणि लोकांना तरी काय सांगतील. अशा काही लोकांमुळे इस्लामचे नाव दहशतवाद आणि चारित्र्यहिन लोकांशी जोडले गेले आहे, असा आरोप हसिना यांनी केला.

    हिफाजत-ए-इस्लाम ही संघटना स्वत:ला इस्लामचा रक्षक मानते. या संघटनेची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. 2008 मध्ये हसीना सरकारने महिलांना संपत्तीत समान वाटा, धर्मनिरपेक्षता, कर्ज आदी मुद्द्यांवर निवडणूक लढविली होती. त्या निवडूनही आल्या होत्या. यानंतर त्यांनी केलेल्या सुधारणांना विरोध करण्यासाठी ही संघटना पुढे आली. बांगलादेशमध्ये धर्मनिरपेक्षता देणे आणि संविधानात बदल करण्याविरोधात हसीना सरकारला या संघटनेने नेहमी विरोध केला आहे.

    Hifazat-e-Islam leader caught inciting violence during PM Narendra Modi’s visit while having fun with a woman at a resort

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या