वृत्तसंस्था
वॅशिंग्टन : कॅनडा आणि अमेरिकेत अचानक कडक ऊन पडू लागले आहे. आकाशातून आगीचे लोळ येत असल्याचे जाणवत आहे. आतापर्यंत शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. उष्म्यामुळे हैराण झालेल्या लोकांनी वॉटर पार्क, नद्यांकडे धाव घेतली. Heat stroke in Canada and the United States Hundreds of deaths; Many run to the water park
कॅनडा आणि अमेरिकेच्या ओरेगान, वॉशिंग्टनमध्ये कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हाची तीव्रता एवढी वाढली आहे की, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ओरेगनचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, ६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे. राज्यातील सर्वात मोठी काउंटी मुल्टनोमा येथे ४५ नागरिकांचा मृत्यू झाला. अनेकांनी वॉटर पार्ककडे धाव घेतली आहे.
कॅनडातील पश्चिमी प्रांत ब्रिटिश कोलंबियाच्या मुख्य कोरोनर लीसा लैपोइंते यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यालयात शुक्रवार ते बुधवार या काळात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ४८६ लोकांचा अचानक मृत्यू झाला. अनेक लोक उन्हापासून वाचण्यासाठी नदी, समुद्र आणि पाणथळ जागेकडे धाव घेत आहेत.
वॉशिंग्टनमध्ये उन्हाच्या तडाख्यात २० जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामानात बदल आणि निसर्गात मानवाने केलेली ढवळाढवळ याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञानी सांगितले.
कॅनडाच्या लिट्टनमध्ये आगीचे तांडव
– कॅनडाच्या लिट्टनमध्ये तापमान ४९.६ डिग्रीवर
– ब्रिटिश कोलंबियामधील लिट्टन गावात भीषण आग
– महापौरांचे हे गाव आहे
प्रत्येकाला लिट्टन सोडण्यास सांगितले आहे. संपूर्ण शहरातच आग लागली आहे. प्रथम धुराचा लोट पाहिला.त्यानंतर १५ मिनिटांत आगीचा भडका उडाला, सर्वत्र आगीचे लोळच लोळ दिसत होते.
– जॅन पॉल्डमॅन
Heat stroke in Canada and the United States Hundreds of deaths; Many run to the water park
महत्त्वाच्या बातम्या
- टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याप्रकरणी अब्दुल राशिद दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
- वारी पंढरीची : संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला 350 वारकऱ्यांना परवानगी
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं थोरातांचं वक्तव्य, पवार म्हणाले- तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा!
- शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवतो, 10 हजारांची फौज आणतो’