Yoga Day World Record : योग कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (21 जून) न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सोहळ्याचे नेतृत्व केले. या कार्यक्रमात अनेक देशांतील लोकांनी मोदींसोबत योगासने केली. अनेक देशांतील लोकांनी एकत्र येऊन एकाचवेळी योगासने केल्याबद्दल जागतिक विश्वविक्रमही नोंदवला गेला आहे. Guinness world record for most nationalities in a Yoga session created at the Yoga Day event led by PM Narendra Modi at the UN HQ in New York
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रवक्ते आणि अधिकृत निर्णायक मायकेल एम्प्रिक यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील योग सत्रात मोठ्या संख्येने देशांतील लोकांच्या सहभागामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहोचले होते.
यूएन मुख्यालयात पंतप्रधान मोदींचे भाषण –
पंतप्रधान मोदी म्हणाले की, योग भारतातून आला आहे आणि ही खूप जुनी परंपरा आहे. योग कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे. तुमचे वय, लिंग आणि तंदुरुस्तीच्या पातळीनुसार योगासने जुळवून घेतली जाते. योग पोर्टेबल आहे.
योग म्हणजे जुडणे –
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्हा सर्वांना पाहून मला आनंद झाला आणि आल्याबद्दल सर्वांचे आभार. मला सांगण्यात आले आहे की आज येथे जवळजवळ प्रत्येक राष्ट्रीयतेचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. योगाचा अर्थ आहे जोडणे, त्यामुळे योगासाठी तुम्ही एकत्र येत आहात.
Guinness world record for most nationalities in a Yoga session created at the Yoga Day event led by PM Narendra Modi at the UN HQ in New York
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले; भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती
- ‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!
- 18 जुलै हाच खरा गद्दार दिन!!; आमदार संजय शिरसाट असे का म्हणाले??